राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुण्याच्या विकासाबाबत काही निरिक्षणं नोंदवली आहेत. “पुण्यात २० ते २५ वर्षांपूर्वी यायचो तेव्हा देहरादूनसारखे झाडी, डोंगर होते. पण आता पुण्याचा खूप विकास झाला आहे”, अशी पोचपावती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली. पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने स्वातंत्र्यदिनी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवृत्ती मागतो, परंतु मिळत नाही!; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भावना

पुण्यात आता ठिकठिकाणी इमारती पाहायला मिळतात. पुण्याचा विकास पाहता काही दिवसातच हे शहर नवी मुंबईपर्यंत पसरेल, असे भाकित कोश्यारी यांनी वर्तवले. पुणे ही लोकमान्य टिळकांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. जुन्या काळात उत्तरेत काशी ही विद्येची, विद्वानांची राजधानी मानली जायची. त्याचप्रमाणे दक्षिणेत आता पुणे विदयेची राजधानी मानली जाते, असे कोश्यारी म्हणाले.

डिजिटल युग, मोबाईलचा वापर, करोना लस या विविध विषयांवर राज्यपालांनी आपले मत व्यक्त केले. माजी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात घरोघरी मोबाईल पोहोचायला सुरुवात झाल्याची आठवण यावेळी राज्यपालांनी सांगितली. आता कुठलीही गोष्ट मोबाईलवर सहज शक्य आहे. अगदी चिमुकल्यांना देखील मोबाईलबाबत सर्व कळतं हे पाहून छान वाटत असल्याचे कोश्यारी यावेळी म्हणाले. मोबाईलबाबत आपल्याला फार काही कळत नसल्याचीही कबुलीही त्यांनी यावेळी दिली.

पाहा व्हिडीओ –

नागपुरात RSS मुख्यालयात मोहन भागवतांच्या हस्ते ध्वजारोहण, ‘भारत माता की जय’चा जयघोष

राज्यपाल कोश्यारी यांनी करोना विषाणूशी कसा सामना केला याबाबतचा अनुभव यावेळी कथन केला. करोना लशीबाबत देशात राजकारण करण्यात आल्याचे ते यावेळी म्हणाले. बुस्टर डोस घेतल्यानंतरही करोना झाला होता. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी प्रकृती सुधारल्याचेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Governor bhagatsingh koshyari on pune development rvs
First published on: 15-08-2022 at 12:19 IST