सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्याभरात कामावर रुजू व्हावं अन्यथा त्यांना पगारकपातीला सामोरं जावं लागेल असं ठाकरे सरकारने म्हटलं आहे. पीटीआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा कामावर रुजू व्हावं असे आदेश ठाकरे सरकारने दिले आहेत. ८ जूनपासून सरकारी कार्यालयं सुरु होणार आहेत. अशात आठवड्याभरातून एकदा कार्यालयात कर्मचाऱ्यांनी हजर रहावं असे आदेश ठाकरे सरकारने म्हटलं आहे.

आणखी वाचा- Cyclone Nisarga: रायगडसाठी उद्धव ठाकरेंकडून १०० कोटींची मदत जाहीर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रायगडचा दौरा केला. रायगड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे ज्यासाठी ठाकरे सरकारने १०० कोटींची मदत जाहीर केली आहे. तसंच ज्या ठिकाणी नुकसान झालंय तिथले पंचनामे तातडीने करा असेही आदेश दिले आहेत. अशात आता ठाकरे सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही एक आदेश दिला आहे. आठवड्याभरातून एकदा कार्यालयात हजेरी लावा अन्यथा पगार कपात होईल असं त्यांनी या आदेशात म्हटलं आहे.