जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. २७ एप्रिलला वसमत, िहगोली, कळमनुरी, तर २९ एप्रिलला सेनगाव, औंढा नागनाथ तालुक्यांतील सरपंचपद आरक्षणाची सोडत होणार असल्याने इच्छुक उमेदवारांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
जिल्ह्यात पूर्वी ५६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या, मात्र अचानक निवडणुका लांबणीवर पडल्या. त्यामुळे निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या उमेदवारांचा हिरमोड झाला. परंतु आता संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, सरपंचपद आरक्षणाच्या सोडतीची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात एकूण ५६५ ग्रामपंचायती आहेत. पकी ४९५ ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते ऑगस्टदरम्यान संपत आहे. सुरुवातीला निवडणुका जाहीर झाल्या असताना सरपंचपदाचा उमेदवार कोण, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यामुळे सरकारने जाहीर केलेला निवडणूक कार्यक्रम लांबणीवर टाकला होता. आता सरपंचपदाचे पुढील पाच वर्षांचे आरक्षण निश्चित करण्याचा निर्णय घेतला असून, जिल्ह्यातील सर्व ५६५ ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.
िहगोली, वसमत व औंढा नागनाथ तालुक्यांतील आरक्षण सोडत २७ एप्रिलला, तर सेनगाव व औंढा नागनाथ तालुक्यांतील ग्रामपंचायत सरपंच आरक्षणाची सोडत २९ एप्रिलला होणार आहे. आरक्षण सोडतीनंतर निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.