scorecardresearch

Premium

ग्रामपंचायचतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले, निवडणूक आयोगाने जाहीर केला कार्यक्रम; आचारसंहिताही लागू

संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर रोजी होईल.

jalgaon list of election booths, jalgaon assembly constituencies
राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं आहे. राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदाच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली.

मदान यांनी सांगितले की, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. मात्र गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे ७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल

exam
माहिती विभागाची पदभरती सहा महिन्‍यांपासून रखडली; उमेदवारांमध्‍ये रोष
rahul narvekar
“आमदार अपात्र प्रकरणात दिरंगाई होणार नाही, पण…”, राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
ShivSena MLA disqualification
‘या’ दिवशी होणार आमदार अपात्रेतचा निर्णय, विधानसभा अध्यक्षांनी दिल्या दोन तारखा; शिंदे गटाची माहिती
MLAs disqualification Ulhas Bapat
“विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला तर…”, आमदार अपात्रतेबाबत कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांचं वक्तव्य

या ठिकाणी होणार निवडणूक

अनेक जिल्ह्यांतील ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे. तर काही ठिकाणी पोटनिवडणूक प्रस्तावित आहे. त्यामुळे राज्यात दिवाळीआधीच राजकीय फटाके फुटणार आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gram panchayat elections in the state the election commission has announced the election programme sgk

First published on: 03-10-2023 at 17:07 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×