scorecardresearch

कोल्हापुरात ग्रामपंचायत सदस्य, ग्राम विकास अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले

उर्वरित रक्कम वर्ग करण्यासाठी धनाजी पाटील व महादेव डोंगळे यांनी देयकाच्या १० टक्के याप्रमाणे ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

कोल्हापुरात ग्रामपंचायत सदस्य, ग्राम विकास अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले

कोल्हापूर : सार्वजनिक शौचालय बांधकाम बांधकामाच्या देयकाची रक्कम मंजूर करण्यासाठी लाचेची रक्कम मागितल्या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांना गुरुवारी रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी कुर्डू (तालुका करवीर) येथील ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील ( वय ४६ ) व ग्रामसेवक महादेव गणपती डोंगळे (वय ५६) अशी कारवाई झालेल्या दोघा संशयित आरोपींची नावे आहेत.
यातील तक्रारदार यांनी कुर्डू गावी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम केले होते. त्याचे २ लाख ९९ हजार रुपयांचे देयक होते. त्यापैकी १ लाख ९७ हजार रुपये यापूर्वी त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले होते.

हेही वाचा : नंदुरबारच्या शहादामध्ये ट्रॅव्हल्स आणि आयशरची जोरदार धडक ; तीन जण ठार तर १७ जण जखमी

उर्वरित रक्कम वर्ग करण्यासाठी धनाजी पाटील व महादेव डोंगळे यांनी देयकाच्या १० टक्के याप्रमाणे ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या मागणीस त्यावर दोघांना त्यावर दोन टक्के प्रमाणे सहा हजार रुपये रक्कम देण्याचे ठरले होते. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा कारवाई केली. डोंगळे हे ५ हजार तर पाटील हे २५ हजार रुपयांचे लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. अशी माहिती पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या