शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक धर्मवीर आनंद दिघेजी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन अशा प्रकारच्या ओळी ट्विटरवर लिहित आदित्य ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या ओळींमधली लक्षात घेण्यासारखी बाब ही आहे की आदित्य ठाकरे यांनी आनंद दिघे यांचा उल्लेख बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक असा केला आहे. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना गुरूस्थानी मानतात, दैवत मानतात. अशात आदित्य ठाकरेंनी केलेल्या या ट्विटची चर्चा होते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धर्मवीर आनंद दिघे यांची आज जयंती

आज धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती आहे. त्यामुळे ठाण्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित असणार आहे. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. शिवसेनेत दोन गट पडल्यापासून सातत्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा उल्लेख गद्दार असा केला जातो आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील गुरुवारी ठाण्यात होते. त्यावेळी त्यांनीही एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता टीका केली होती.

आनंद दिघेंच्या जयंतीदिनी राजन विचारेंनी जारी केला खास व्हिडीओ; म्हणाले, “…हीच दिघे साहेबांना गुरुदक्षिणा”

काय म्हटलं होतं उद्धव ठाकरेंनी?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ठाण्यात आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबीरात उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी छोटेखानी भाषणात त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या गटावर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले जे अस्सल शिवसैनिक निखाऱ्यासारखे माझ्यासोबत राहिले आहेत हे निखारेच उद्या राजकारणात मशाल पेटवणार आहेत असं म्हणत ठाण्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सगळ्यांना टोला लगावला आहे. तसंच महाराष्ट्रात जे काही घडलं त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर मी लवकरच ठाण्यात सभा घेणार आहे असंही उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आहे.

“दिघे साहेबांची समाधी एकनाथ शिंदेंनी बांधली म्हणून तिथे तुमची..”, शिंदे गटाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका!

आता नेमका हाच धागा पकड आदित्य ठाकरे यांनीही आनंद दिघे यांचा उल्लेख बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे शिवसैनिक असा केला आहे. आदित्य ठाकरे यांनी दिवंगत आनंद दिघे यांना अभिवादन करताना सच्चे शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार सच्चे नाहीत हे त्यांना यातून ध्वनित करायचं आहे हेच हे ट्विट सांगून जातं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Greetings to dharmaveer anand dighe a true shiv sainik of shiv sena chief balasaheb thackeray on his birth anniversary says aditya thackeray scj
First published on: 27-01-2023 at 14:42 IST