राज्यातील १३६४ केंद्रांवर पार पडली आरोग्य विभागातील गट ‘ड’ संवर्गाची परीक्षा

परीक्षा सुरळीतपणे पार पडल्याचे, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ड संवर्गातील एकूण ३४६२ पदे भरण्यासाठीची लेखी आज(रविवार) सुरळीतपणे पार पडल्याचे, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.

त्यांनी सांगितले की, आज राज्यातील १३६४ केंद्रांवर परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी ४,६१,४९७ उमेदवारांनी अर्ज केले होते. ४१२२०० उमेदवारांनी प्रवेशपत्र प्राप्त करून घेतले होते.

चंद्रपूर, भंडारा, अकोला, मुंबई व ठाणे जिल्हयांमध्ये उमेदवारांनी परिक्षेचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करून परीक्षा देण्यास नकार दिला. मात्र त्यांच्या संशयात काहीही तथ्य नाही. कारण परीक्षेच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना नियुक्ती करण्यात आली होते. त्यामुळे काही उमेदवारांनी व्यक्त केलेल्या शंकेला काहीही आधार नाही. याबाबत कोणा उमेदवारांना आपले म्हणणे मांडावे, त्याबाबतची सत्यता तपासून पाहिली जाईल. वरील केंद्रांवर उमेदवारानां सर्व परिस्थिती समजावून सांगितल्यानंतर त्यापैकी मोहाडी, जि. भंडारा वगळता इतर केंद्रातील सर्व उमेदवारांनी परिक्षा दिली आणि परीक्षा प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली, असे त्यांनी स्पष्ट केले.

बीड येथे तीन उमेदवारांनी आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपरकरणाव्दारे परिक्षा देण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक पोलिसांनी वेळीच या उमेदवारांना ताब्यात घेतले. याबाबत पुढील कार्यवाही पोलीसांकडून करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Group d category examination of health department was passed at 1364 centers in the state msr

ताज्या बातम्या