scorecardresearch

‘गुजरातचा निकाल देशाला २०२४ चा निवडणूकीसाठी दिशा देणारा’ शंभूराज देसाई

शुंभुराजे देसाई म्हणाले, कोणी कितीही यात्रा काढल्या तरी लोक विकासाच्या मागे उभे राहतात, हे या निकालातून दिसून आले आहे.

‘गुजरातचा निकाल देशाला २०२४ चा निवडणूकीसाठी दिशा देणारा’ शंभूराज देसाई
शंभुराज देसाई (संग्रहित छायाचित्र)

गुजरात निवडणुकीत भाजपाने आपला इतिहासातील सर्वात मोठा विजय प्राप्त केला आहे. भाजपाने आपले सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. भाजपाने १५७ जागांवर विजय मिळवला आहे. तर, काँग्रेसला केवळ १७ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. हा निकाल देशाला २०२४ चा निवडणूकीसाठी दिशा देणारा आहे, असे मत साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे. सातारमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

देसाई म्हणाले, या विजयानंतर मोदींच्या विचारांच्या पाठीशी जनता उभी रााहिल्याचे दिसून आले आहे. कोणी कितीही यात्रा काढल्या तरी लोक विकासाच्या मागे उभे राहतात, हे या निकालातून दिसून आले आहे, असं म्हणत देसाईंनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा- हिमाचल प्रदेश निवडणुकीवरून अजित पवारांचा नड्डांना खोचक टोला; म्हणाले, “जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांना…”

देशाला दिशा देणाऱ्या गुजरातच्या निकालाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दृष्टीकोन, विचारांवर शिक्कामोर्तब झाले आहे. लोकसभेच्या २०२४ सालच्या निवडणुकीला या निकालाने दिशा मिळाली. विविध राज्ये आणि देशही अपेक्षित विकास आणि प्रगतीत अव्वलस्थान गाठत असल्याने नरेंद्र मोदींच्या पाठीशी जनता उभी राहिली असल्याचा विश्वास मंत्री शंभूराज यांनी व्यक्त केला.

हेही वाचा- “महाराष्ट्रद्रोह्यांना वेळीच आवरले नाही, तर…”; उद्धव ठाकरेंचे शिंदे-भाजपा सरकारवर टीकास्र, गुजरात निवडणुकीवरूनही लगावला टोला

संजय राऊतांवरही लक्ष्य

महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी संजय राऊत यांना कधी चार दिवस अटक झाली आहे का? राऊत यांनी वाचाळ बडबड बंद करावी, असा टोलाही शंभूराज देसाईंनी राऊतांना लगावला आहे. संजय राऊत यांना धमकीचे फोन आले हे सांगण्यास चोवीस तास का लागले? असाही प्रश्न शंभूराजेंनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 23:01 IST

संबंधित बातम्या