राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांना घेऊन भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. भाजपा आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते सातत्याने दावा करत आहेत की, लवकरच अजित पवार भाजपात जातील. तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडून आणि राष्ट्रवादीच्या आमदारांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे या चर्चांना अधिकच खतपाणी मिळू लागलं आहे. दरम्यान, शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी दावा केला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपाचा जोरदार पाऊस पडेल असं चित्र निर्माण झालं आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले की, अजितदादा हे डॅशिंग नेते आहेत, ते काही नॉट रिचेबलवाले नेते नाहीत. त्या माणसाला कायतरी जीवन आहे. ते २४ तास काम करत असतात. त्यामुळे मला नाय वाटत ते कुठलाही निर्णय घेताना घाबरून निर्णय घेतील. निश्चितपणे जुळवाजळव करायला थोडा वेळ लागतोय. परंतु जुळवाजुळव होईल तेव्हा मला वाटतं भाजपा आणि शिवसेनेत पाऊस पडेल. भाजपा, शिवसेना आणि अजित दादा एकत्र आले तर ‘अमक अकबर अँथोनी’ चांगला पिक्चर चालेल.

cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?
narayan rane On uddhav thackeray
“आम्ही मातोश्रीवर भेट द्यायचो तेव्हा प्रसाद घेऊन जावा लागायचा, मग तो काळा पैसा नव्हता का?”; नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
Devendra Fadnavis on Ambadas Danve
अंबादास दानवेंच्या पक्षप्रवेशावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ऑपरेशन केल्यानंतर…”
latur lok sabha marathi news, archana patil joined bjp marathi news, shivraj patil chakurkar marathi news
शिवराज पाटील यांच्या स्नुषेच्या भाजप प्रवेशाने लातूरमधील राजकीय गणिते बदलली

हे ही वाचा >> “अजित पवार घेतील तो निर्णय मान्य, पण…”, भाजपाप्रवेशाच्या चर्चेवर अमोल मिटकरीचं सूचक वक्तव्य

पाटील म्हणाले की, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची वक्तव्ये पाहा जरा. आमदार माणिकराव कोकाटे म्हणाले आम्ही अजितदादांच्या मागे आहोत. आमदार अण्णा बनसोडे काय म्हणाले ते पाहा. हे कशाचं द्योतक आहे? त्यांचे आमदार असं का बोलत आहेत? मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या ढगाळ वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मला नाही वाटत अजितदादा आता तिथे थांबतील.