scorecardresearch

Premium

“ते जर राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून…”, भाजपा-शिंदे युतीला विरोध करणाऱ्यांचा गुलाबराव पाटलांकडून समाचार

आगामी काळात जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप युती एकत्रितपणे ही निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे.

gulabrao patil
गुलाबराव पाटील जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची तयारी करत आहेत.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपा-शिवसेना (शिंदे गट) युतीला विरोध करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्यांना मंत्री गुलाबराव पाटलांनी खडसावलं आहे. आम्ही विकासासाठी उठाव केला आहे. ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व मान्य नसेल ते आम्हाला विरोध करतील. असं पाटील पदाधिकाऱ्यांसमोर म्हणाले.

गुलाबराव पाटील म्हणाले की, आपण सगळे एकनाथ शिंदे साहेबांचे लोक आहोत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून एकत्र आलो आहोत, त्यांना (भाजपा-शिंदे युतीला विरोध करणारे भाजपा पदाधिकारी) काय बोलायचं ते बोलू द्या. आपण पंतप्रधान मोदींचं नेतृत्व मान्य केलं आहे. ज्यांना ते मान्य नसेल ते आपल्याला विरोध करतील.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
hunger strike, Rohit Patil, Health deteriorated, sangli
उपोषण सुरु करताच रोहित पाटलांची प्रकृती खालावली

पाटील कार्यकर्त्यांना म्हणाले की, आपण एक मोठा विचार घेऊन एकत्र आलो आहोत. परंतु छोट्यामोठ्या निवडणुकीसाठी ते (भाजपा) जर राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसत असलीत तर मोदीसाहेबांसाठी ते धोकादायक आहे असं मला वाटतं. आपण सर्वांनी शांततेने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. त्यांना काय बोलायचं ते बोलू द्यावं, एकही शब्द आपण बोलायला नको.

हे ही वाचा >> “संयोगीताराजेंचा अपमान करणाऱ्या महंतांना २४ तासांत अटक करा, अन्यथा…”, अमोल मिटकरींचा सरकारला इशारा

भाजपा-शिंदे युतीला विरोध

आगामी काळात जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार आहे. पाटील या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप युती एकत्रितपणे ही निवडणूक लढणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. परंतु स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांचा या युतीला विरोध होत असल्याने पाटील यांनी विरोध करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समाचार घेतला. यासंबंधीचं वृत्त टीव्ही ९ मराठी वाहिनीने प्रसिद्ध केलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gulabrao patil says we came with bjp believing in pm narendra modi asc

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×