माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एप्रिलला जळगाव जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत. येत्या २३ एप्रिलला उद्धव ठाकरे यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे विराट सभा होणार आहे. माजी आमदार स्वर्गीय आर.ओ. पाटील यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी या विराट सभेचं आयोजन केलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या यापूर्वीही छत्रपती संभाजीनगर, खेड, मालेगाव येथे जाहीर सभा झाल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी या सभांमधून शिंदे सरकारवर तोफ डागली आहे. महागाई, बेरोजगारीसह शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी राज्य सरकावर टीकास्र सोडलं आहे. त्यामुळे जळगावच्या सभेत उद्धव ठाकरे कोणाला लक्ष्य करणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशातच मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाला इशारा दिला आहे.

Jitendra Awhad
“ठाण्यात ‘वरून’ हा शब्द सुरू झालाय, तो कुठून येतो? हे…”, जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट चर्चेत
pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित
lok sabha election 2024 bjp face hurdle over maharashtra seat sharing deal with shinde shiv sena
कोंडी कायम; शिंदे, पवारांचा अधिक जागांवर दावा; ठाण्यासाठी भाजपचा आग्रह, मनसेच्या समावेशास शिवसेनेचा विरोध

हेही वाचा : “महाराष्ट्र सरकार जनतेलाच घाबरू लागलंय”, नितीन देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर संजय राऊतांचं ट्वीट; म्हणाले, “इथे मोगलाई…!”

प्रसारमाध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “आर.ओ. पाटील यांचे माझ्यावर फार उपकार होते. त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी उद्धव ठाकरे येत आहेत. आर.ओ. पाटील यांचे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पहिल्यापासून संबंध होते. त्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे येत आहेत.”

“पुतळ्याचं अनावर करण्यासाठी येत असतील, तर जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचं स्वागत आहे. पण, सभेत संजय राऊतांसारख माणूस माझ्यावर बोलत असेल, तर मी एसपींना पत्र देणार आहे, त्यांनी चौकटीत राहून बोलावं. अन्यथा सभेत घुसणार आहे,” असा इशारा गुलाबराव पाटलांनी दिला आहे.

हेही वाचा : “आमच्याकडे गुजरातची पावडर”, संजय गायकवाडांच्या वक्तव्यावर नाना पटोलेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

कसा असेल उद्धव ठाकरेंचा जळगाव दौरा?

  • सकाळी ११ वाजता जळगाव विमानतळावर आगमन
  • सकाळी १२.३० वाजता पाचोरा निर्मल सिड्स विश्रामगृहात
  • दुपारी १ ते २ दरम्यान भोजन
  • दुपारी २ ते ३ विश्रांती
  • दुपारी ३ ते ४ राखीव
  • दुपारी ४.३० वाजता आर.ओ. पाटील प्रयोगशाळेचं उद्घाटन
  • संध्याकाळी ५.१५ वाजता शिवसेना माजी आमदार आर.ओ. पाटील यांच्या पुतळ्याचं उद्घाटन
  • संध्याकाळी ६.१५ वाजता एम.एम. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा