मराठ आरक्षण तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. संजय शिरसाट यांनी बाबा कंस्ट्रक्शन्स या बांधकाम क्षेत्रातील कंपनीला धमकावले आहे, असा आरोप सदावर्ते यांनी केला आहे. विशेष म्हणजे या धमकीप्रकरणाशी निगडित एक कॉल रेकॉर्डिंग त्यांच्याकडे असल्याचा दावाही सदावर्ते यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>> पंकजा मुंडेंच्या मोदींवरील विधानानंतर भाजपा आमदाराची प्रतिक्रिया; म्हणाले “ओघाओघातून त्यांच्या..”

“मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायधीशांच्या निवासासाठी इमारत बांधण्यात येत आहे. या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवलेली गेली नाही. हे कंत्रात ४७ कोटी रुपयांचे आहे. वंडर ही कंपनी अपात्र आहे. या कंपनीने निविदा भरताना बीडमध्ये सात मजली रुग्णालयाचे बांधकाम केल्याचे सांगितले आहे. मात्र ती इमारत सात मजल्यांची नाही. चुकीची माहिती सादर करून या कंपनीने कंत्रात मिळवले. वर्क ऑर्डर देण्याआधी आमचे पक्षाकार बाबा कंस्ट्रक्शन कंपनीला संजय शिरसाट यांच्या स्वीय सहाय्यकाने बोलावले. तेथे आमच्या पक्षकाराला धमकी देण्यात आली. ही बाब न्यायालयाच्या लक्षात आणून देण्यात आली आहे,” असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

हेही वाचा >>>> छगन भुजबळांच्या सरस्वतीवरील वक्तव्याने वाद, CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “कुठलेही फोटो…”

“आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात न्यायालयात एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. निविदा भरण्यापासून परावृत्त करणे. निविदा भरल्यानंतरही स्वीय सहाय्यकाच्या माध्यमातून धमकावणे, कामात अडथळा निर्माण करणे, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. आमचे पक्षाकार म्हणजेच बाबा कंस्टक्शन कपंनीच्या लोकांना संजय शिरसाट यांच्या पीएने बोलावून धमकावले,” असा दावा सदावर्ते यांनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gunaratna sadavarte allegation on sanjay shirsat prd
First published on: 28-09-2022 at 18:20 IST