gunpoint robbers looted jewellry homeowner locks toilet robber ysh 95 | Loksatta

बंदुकीच्या धाकावर दरोडेखोरांनी दागिने लुटले; घरमालकाला शौचालयात कोंडून दरोडेखोर पसार

बंदुकीच्या धाकावर दरोडेखोरांनी सहा लाखांचे दागिने लुटल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील दरेगाव येथे मध्यरात्री घडली.

बंदुकीच्या धाकावर दरोडेखोरांनी दागिने लुटले; घरमालकाला शौचालयात कोंडून दरोडेखोर पसार
संग्रहित छायाचित्र

अकोला : बंदुकीच्या धाकावर दरोडेखोरांनी सहा लाखांचे दागिने लुटल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील दरेगाव येथे मध्यरात्री घडली. घरमालकाला शौचालयात कोंडून दरोडेखोर पसार झाले. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरेगाव येथील गजानन सुरेश बंगाळे हे घरी कुटुंबीयांसह झोपले असताना दरोडेखोरांनी दार वाजवले. दरवाजा उघडताच सहा ते सात जण घरात शिरले. त्यांनी पैशांची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिली. दरोडेखोरांनी मारहाण करून गावठी पिस्तूलचा धाक दाखवला. पैसे नसल्याचे सांगितल्यावर दरोडेखोरांनी आलमारीतील नेकलेस, पाटल्या, मंगळसूत्रे, अत्तरदाणी, दोन मोबाईल व ५० हजार रुपये रोख, असा एकूण सहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घरमालकाला शौचालयात हातपाय बांधून कोंडून ठेवले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. श्वानपथकाला पाचारण करून आरोपींचा शोध घेण्यात आला. साखरखेर्डा पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपींचा शोध सुरू असून लवकरच दरोडेखोरांना ताब्यात घेऊ, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अकोल्याचा यात्रेकरू अमरनाथच्या दरीत कोसळला

संबंधित बातम्या

“घोडचुकीनंतर एखादा निर्लज्जच…” राज्यपाल कोश्यारींच्या विधानावर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
“…तर आता यांच्या पोटात गोळा यायला लागला”, उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंवर टीकास्र
“जरंडेश्वरचा खरा मालक कोण हे अजित पवारांनी सांगावे”; आयकर विभागाच्या छाप्यानंतर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया
“सूर बदले है जनाब के, कालचा वाघ…” मनसेचा संजय राऊतांना उद्देशून खोचक ट्वीट; सुषमा अंधारेंनाही टोला!
“ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का?”; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
कर्नाटक उच्च न्यायालयाकडून ‘पीएफआय’वरील बंदी कायम
गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान
रब्बी हंगामात उच्चांकी पेरा; डिसेंबरअखेपर्यंत ६५ लाख हेक्टरवर लागवडीचा अंदाज
आरोग्य वार्ता : कर्करोगावरील उपचारात मुली मागे
ऊस गाळपाची गती मंदावली, शेतकरी चिंतेत; लातूर जिल्ह्यातील चित्र