scorecardresearch

गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापूर न्यायालयाकडून काहिसा दिलासा; प्रतिक्रिया देत म्हणाले, “…म्हणून माझा खून होत नाही”

न्यायालयाने सदावर्ते यांना काहिसा दिलासा देत पोलिसांची पोलीस कोठडीची मागणी अमान्य करत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

(संग्रहीत छायाचित्र)

वकील गुणरत्न सदावर्ते यांना सोमवारी (२५ एप्रिल) पोलीस कोठडीची मूदत संपल्यानंतर कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने सदावर्ते यांना काहिसा दिलासा देत पोलिसांची पोलीस कोठडीची मागणी अमान्य करत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. हा दिलासा मिळाल्यानंतर सदावर्ते यांनी ही संविधानाची ताकत असल्याचे म्हटले.

मराठा समाज व मागासवर्गीय समाज यांच्या जातीय तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर विधान केल्याप्रकरणी सदावर्ते यांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. त्याची मुदत संपल्यावर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने सदावर्तेंना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली.

“…म्हणून माझा खून होत नाही”

यावेळी माध्यमांशी बोलताना सदावर्ते यांनी आपण राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर यांच्या विचाराचे वंशज असल्याचा दावा केला. चौथा स्तंभ पाठीशी असल्यामुळे माझा खून होत नाही, असंही सदावर्ते म्हणाले. कोल्हापूर पाठोपाठ पुणे पोलीस सदावर्ते यांना अटक करणार आहेत. यावरून जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे का, असे विचारले असता सदावर्ते यांनी संविधानाची शक्ती त्रास बाजूला ठेवते असे मत व्यक्त केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gunratna sadavarte first reaction after 14 days judicial custody in kolhapur pbs

ताज्या बातम्या