scorecardresearch

Premium

भाजपच्या सदस्य नोंदणीबद्दल कोल्हापुरात आनंदोत्सव

राज्यात भाजपने सदस्यसंख्येचा एक कोटीचा उंबरठा पार केल्याबद्दल शनिवारी करवीरनगरीत कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

भाजपच्या सदस्य नोंदणीबद्दल कोल्हापुरात आनंदोत्सव

राज्यात भाजपने सदस्यसंख्येचा एक कोटीचा उंबरठा पार केल्याबद्दल शनिवारी करवीरनगरीत कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. या वेळी ‘छ. शिवाजीमहाराजांचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी शिवाजी चौक येथे झालेल्या कार्यक्रमावेळी केली.
देशात व राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर पक्षाने देशात १० कोटी सभासद नोंदणीचे अभियान हाती घेतले होते. चार महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या अभियानांतर्गत राज्यासाठी एक कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट शनिवारी पूर्ण झाले असल्याची घोषणा प्रदेश भाजपच्या वतीने अधिकृतरीत्या जाहीर केली. राज्यात सदस्य नोंदणीचा हा विक्रम असून इतक्या मोठय़ा प्रमाणात आम जनतेमध्ये जाऊन सभादाकरवी आणि त्यांना पक्षाशी जोडून घेण्याचा कार्यक्रम पार पडणे हे मोठे काम आहे, असे मत या वेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी व्यक्त केले. या यशाबद्दल साखर पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच फटाक्याची आतिषबाजीही करण्यात आली. या वेळी भाजपचे महामंत्री बाबा देसाई यांनी छ. शिवाजीमहाराजांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण केला. कार्यकत्रे मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Happiness celebrated in kolhapur about bjp member registration

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×