NCP Hasan Mushrif ED Raid : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर छापे टाकले आहेत. कागल आणि पुण्यातील घरांवर ही करावाई करण्यात आली. दरम्यान, यासंदर्भात हसन मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहनही केलं आहे.

हेही वाचा – “सत्तेविरोधात बोलणाऱ्यांवरच ईडीचे छापे पडतात”; हसन मुश्रीफांवरील कारवाईवरून संजय राऊतांचं टीकास्र; म्हणाले, “भाजपा नेते…”

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Budaun murder
“चकमकीत ठार झाला हे योग्यच झालं”, दोन मुलांची गळा चिरून हत्या करणाऱ्या साजिदच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया

काय म्हणाले हसन मुश्रीफ?

“माझ्या आणि माझ्या मुलीच्या घरावर ईडीने छापे टाकल्याची माहिती मला मिळाली आहे. मी कामानिमित्त बाहेगावी असल्याने दुरध्वनीवरून मला ही माहिती मिळाली. माझा कारखाना, नातेवाईकांची घरं तपासण्याचे काम सुरू आहे. माझ्यावरील ईडीच्या या कारवाई विरोधात कागल बंदची घोषणा कार्यकर्त्यांनी दिली असल्याचेही मला समजलं आहे. त्यामुळे माझी कार्यकर्त्यांनी विनंती आहे, की त्यांनी हा बंद मागे घ्यावा आणि शांतात राखावी, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही वर्तन कार्यकर्त्यांनी करू”, असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा – Hasan Mushrif ED Raid : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरावर ईडीची छापेमारी

पुढे बोलताना, “दीड दोन वर्षांपूर्वीही ईडीने असाच प्रकारे माझ्या घरांवर छापे टाकले होते. तेव्हा सर्व माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनी घेतली होती. त्यात काहीही निष्पन्न झालं नव्हतं. मग पुन्हा कशासाठी छापेमारी करण्यात आली, याबाबत मला माहिती नाही. याबाबत सर्व माहिती घेतल्यानंतर सविस्तर प्रतिक्रिया देईन”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – ED Raid: कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर जयंत पाटील यांचे सूचक विधान; म्हणाले, “अशा कारवाया करणाऱ्या यंत्रणांनी…”

“चार दिवसांपूर्वी कागलमधील भाजपाचे नेते दिल्लीत जाऊन आले. माझ्यावर कारवाई करावी, असे प्रयत्न त्यांनी केले. एकंदरीतच हे गलिच्छ राजकारण आहे. राजकारणात अशा प्रकारे कारवाया होत असतील तर याचा निषेधच झाला पाहिजे. नवाब मलिक झाले, आता माझ्यावर कारवाई सुरू आहे. किरीट सोमय्या म्हणतात अस्लम शेख यांच्यावरही कारवाई होईल, याचा अर्थ विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य केलं जात आहे”, असा आरोपही त्यांनी केला.