Hasan Mushrif : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं, त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत आलं. महायुतीने विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी मोठ्या घेषणा केल्या होत्या. त्यामध्ये महिलांसाठी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांचं वीज बील माफ तसेच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी अशा मोठ्या घोषणा केल्या होत्या. यानंतर काही योजना सुरु देखील करण्यात आल्या आहेत. मात्र, सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या एका विधानाची आता चर्चा रंगली आहे. आज कोल्हापूरमध्ये एका कार्यक्रमात हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात भाष्य केलं. ‘आता पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार’, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं. दरम्यान, त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळाच चर्चा रंगली. मात्र, त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी यासंदर्भात स्पष्टीकरणही दिलं आहे.

कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Kumbh Mela 2025 : कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
Sharad Pawar: मविआचं पुढं काय होणार? राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Sanjay Raut Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नेमकं नातं काय? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्याना गंभीर सवाल
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”
Nitish Kumar
Nitish Kumar : नितीश कुमार ‘ॲक्शन मोड’वर; बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करणार?
CM Devendra Fadnavis Nagpur Interview
Devendra Fadnavis : कठोर राजकारणी कोण मोदी की अमित शाह? देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं?

हेही वाचा : महाराष्ट्रातील मद्यप्रेमींवर महसूल वाढवण्याची जबाबदारी! रिकामी तिजोरी भरण्यासाठी सरकार कर वाढवण्याच्या तयारीत

हसन मुश्रीफ काय म्हणाले?

“विधानसभेच्या निवडणुका आता संपलेल्या आहेत. तीन सिलेंडर देण्याची योजना आम्ही बंद करणार नाहीत. मुलींचं उच्च शिक्षण देखील मोफत सुरु राहील. महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत आहे. लाडक्या शेतकऱ्यांचं वीज बील आम्ही माफ केलेलं आहे. अशा अनेक योजना सुरु आहेत. तसेच आता पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मग कर्ज माफी करणार आहोत. पाच वर्षात करायची आहे ना?”, असं विधान हसन मुश्रीफ यांनी केलं.

हसन मुश्रीफांनी काय स्पष्टीकरण दिलं?

“मी असं म्हटलं की पाच वर्षांचा जाहीरनामा आहे. आर्थिक परिस्थिती पाहून राज्य सरकार कर्जमाफी करणार आहे. सतेज पाटील यांनी थोडी कळ काढावी म्हणून मला तसं बोलावं लागलं”, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं. तसेच ते पुढे म्हणाले, “पाच वर्षांसाठी आपला जाहीरनामा असतो. त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीची परिस्थिती पाहून आम्ही योग्यवेळी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल”, असं स्पष्टीकरण हसन मुश्रीफ यांनी दिलं.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत अजित पवार काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील दौंड येथील एका कार्यक्रमात आपण कर्जमाफीबद्दल बोललो नसल्याचं विधान केलं आहे. ते म्हणाले, “माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का?”, असं विधान अजित पवार यांनी केलं आहे. दरम्यान,हसन मुश्रीफ आणि अजित पवार यांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Story img Loader