राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज (बुधवार) पहाटे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापेमारी केली आहे. मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील निवासस्थांसह त्यांच्या मुलांच्या आणि मुलीच्या घरावरही ईडीने छापेमारी केली. या कारवाईनंतर हसन मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ईडीकडून केलेल्या कारवाईची माहिती दिली असून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

दरम्यान, भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याबाबत दिलेल्या ऑफरबाबत विचारलं असता, मुश्रीफ यांनी हसत-हसत उत्तर देण्याचं टाळलं. तोच प्रश्न पुन्हा विचारला असता, मुश्रीफ यांनी ‘असं कसं होईल’ असं विधान केलं. चंद्रकांत पाटलांच्या ऑफरबाबत मुश्रीफ यांनी कोणतीही भूमिका स्पष्टपणे मांडली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
jayant patil praful patel
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”, पटेलांच्या दाव्यावर जयंत पाटील म्हणाले, “त्यांना पक्षसंघटना…”
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी

हेही वाचा- “कोल्हापुरातील महालक्ष्मीच्या आशीर्वादाने हसन मियांचं…”, ED छापेमारीनंतर किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

दुसरीकडे, ईडीने केलेल्या कारवाईची माहिती देताना मुश्रीफ म्हणाले, “आज सकाळी सहा वाजल्यापासून ईडीने माझ्या निवासस्थानी, मुलांच्या आणि मुलीच्या घरावर, मुलांच्या कारखान्यावर छापे टाकले. पुण्यातही काही व्यक्तींच्या घरावर ईडीने छापेमारी केली. ही कारवाई करण्याआधी ईडीने मला कोणत्याही प्रकारची नोटीस अथव समन्स बजावला नव्हता. संबंधित कारखान्याशी माझा काहीही संबंध नाही. या कारखान्यावर चार वर्षांपूर्वी प्राप्तीकर विभागाने छापे टाकले. तपासण्या झाल्या.”

हेहा वाचा- बारा तास चौकशीनंतर ईडी पथक परतले; मुश्रीफांच्या घराबाहेर समर्थकांचा मेळावा

तसेच किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर मी तीनवेळा पत्रकार परिषद घेऊन उत्तरं दिली आहे. तो खुलासा केल्यानंतरही किरीट सोमय्यांनी नव्याने माझ्यावर तेच आरोप केले. त्यामुळे त्यांच्या विरोधात दीड कोटींचा मानहानीचा दावा ठोकण्यात आला आहे. संबंधित प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.