तुळजापुरात श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा राडा | hassle in shri shri ravishankars program in tuljapur osmanabad sambhaji brigade protest rmm 97 | Loksatta

तुळजापुरात श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा राडा

तुळजापूरमध्ये रविशंकर यांच्या ‘जागर भक्तीचा’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला आहे.

shri shri ravishankar
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

‘आर्ट ऑफ लिव्हींग’चे संस्थापक धर्मगुरू श्री श्री रविशंकर आज उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे आले होते. तुळजापूरमध्ये रविशंकर यांच्या ‘जागर भक्तीचा’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला आहे. त्यांनी श्री श्री रविशंकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

या घटनाक्रमानंतर रविशंकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला असून त्यांनी कार्यकर्त्यांना प्रेमाने वागण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या कामाचीही स्तुती केली.

हेही वाचा- “संघाच्या बागेत देवेंद्रजींची दरी…”, नागपूरमधील विजयानंतर मिटकरींची फडणवीस-बावनकुळेंवर टोलेबाजी!

खरं तर, श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्या जुन्या विधानावरून संभाजी ब्रिगेडने आंदोलंनाचा इशारा दिला होता. यामुळे कार्यक्रमस्थळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही काही कार्यकर्त्यांनी श्री श्री रविशंकर यांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ संबंधित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

हेही वाचा- “जगात एकाच व्यक्तीला खूप घाबरते”, थेट नाव घेत पंकजा मुंडेंचं विधान!

कार्यक्रमाच्या शेवटी श्री श्री रविशंकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या कामाची स्तुती केली. तसेच इतिहासकारांच्या वेगवेगळ्या लिखानामुळे काही चुका झाल्या तर त्याकडे दुर्लक्ष करून आपण मिळून काम करू… असा प्रेमाचा सल्ला श्री श्री रविशंकर यांनी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 22:48 IST
Next Story
Adani Group : “ज्या कंपनीचे भवितव्य धोक्यात आहे अशा कंपनीशी…”; ‘अदाणी’वरून सचिन सावंतांचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल!