Nitesh Rane on Munawar Faruqui: स्टॅन्ड अप कॉमेडियन आणि बिग बॉस १७ चा विजेता मुनव्वर फारुकी हा सध्या चर्चेत आहे. मुंबईतील एका स्टॅन्ड अप कॉमेडी शोदरम्यान प्रेक्षकांशी संवाद साधत असताना कोकणी माणसाबद्दल त्याने अपशब्द उच्चारले होते. मनसेकडून त्याच्या कॉमेडी शोचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर फारुकीच्या विरोधात नाराजी पसरली. मुंबईत राहणाऱ्या कोकणी माणसाचा फारुकीने अवमान केला असल्याची ओरड झाल्यानंतर मुनव्वर फारुकीने पुन्हा एक व्हिडीओ तयार करत माफी मागितली. पण आता माफीवर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी आक्षेप घेतला असून त्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

काय म्हणाले नितेश राणे?

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना नितेश राणे यांनी मुनव्वर फारुकीला इशारा दिला. ते म्हणाले, “मुनव्वर फारुकीची गुन्हा करण्याची सवयच आहे. ‘लातों के भूत, बातों से नही मानते’, या म्हणीप्रमाणे त्याला धडा शिकवावा लागेल. हिंदू समाज, प्रभू रामचंद्र यांच्याबद्दल त्याने चुकीचे काही म्हटले होते, त्यानंतर माफी मागितली. आता कोकणी माणसाचा अपमान केला, त्यानंतर पुन्हा माफी मागितली. आता आम्हीही त्याच्या कानशि‍लात लगावतो आणि नंतर माफी मागतो.”

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण योजने’च्या अर्ज प्रक्रियेमुळे महिलांच्या बँक खात्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर; आदिती तटकरेंनी दिले आदेश!
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Thackeray group on Eknath Shinde
Sanjay Raut : “ज्या दिवशी सत्ता जाईल, त्या दिवशी…”, मुख्यमंत्री शिंदेंवर ठाकरे गटाचा हल्लाबोल
Manu Bhaker says Neeraj is my senior player
Manu Bhaker Neeraj Chopra : ‘माझ्यात आणि नीरजमध्ये…’, मनू भाकेरने लग्नाबाबतच्या चर्चेवर सोडले मौन; म्हणाली, तो मला…
Manu Bhaker's Father Statement on His Daughter and Neeraj Chopra Marriage Rumors
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेर-नीरज चोप्राची सोयरीक जुळली? मनूच्या वडिलांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले, “नीरजला आम्ही…”
Rajiv Kumar on Maharashtra Assembly Election Date Schedule in Marathi
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचं मोठं विधान, म्हणाले…
Abhishek Bachchan reacts on divorce rumors with Aishwarya Rai
ऐश्वर्या रायपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन; म्हणाला…
antim panghal sent back to india
Paris Olympic 2024: ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये बहिणीची ‘तस्करी’ करणाऱ्या अंतिम पांघालची भारतात रवानगी

हे वाचा >> Munawar Faruqui : “मराठी माणसांना दुखवण्याचा हेतू नव्हता, मला..”, मनसेच्या हिसक्यानंतर मुनव्वर फारुखीचा माफीनामा

आमचा हिंदू समाज, कोकणी माणूस, धर्म हा मस्करीचा विषय नाही. कुणीही त्यावर थट्टा-मस्करी करू नये. नाहीतर आम्हीही कानशि‍लात लगावून तुमची माफी मागू, असेही नितेश राणे म्हणाले. तत्पूर्वी नितेश राणे यांनी १२ ऑगस्ट रोजी मुनव्वर फारुकीच्या माफीनाम्याचा व्हिडीओही पोस्ट केला होता. त्यातही त्याला इशारा दिला गेला होता.

मुनव्वर फारुकी कोण आहे?

मुनव्वर फारुकी ( Munawar Faruqui ) हा एक कॉमेडियन व रॅपर म्हणून ओळखला जातो. त्याच्या अनेक कविता, किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ‘बिग बॉस’च्या आधी मुनव्वरने ‘लॉकअप’च्या पहिल्या सिझनच्या विजेतेपदावर नाव कोरले होते. तेव्हापासून लोकप्रिय झाला. त्याच्या जन्म २८ जानेवारी १९९२ रोजी गुजरातमधील जुनागडमध्ये झाला. आईच्या निधनानंतर तो मुंबईला आला. २०२० मध्ये मुनव्वरच्या वडिलांचे निधन झाले. दरम्यान, ‘दाऊद, यमराज औरत’ या म्युजिक व्हिडीओमुळे त्याला करिअरमध्ये खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली.