राज्य शासनाची आरोग्य विभागाची गट क व गट ड ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. अनेक उमेदवाराच्या मोबाईलवर अधिकृत मेसेज पाठवण्यात आले आहेत. आरोग्य विभागाची परीक्षा ही २४ सप्टेंबर आणि २५ सप्टेंबर या दिवशी होणार होती. राज्यातील १५०० केंद्रांवर एकाच वेळी ही भरती प्रक्रिया शासनाने निवडलेल्या खासगी बाह्य स्त्रोतांमार्फत घेण्यात येणार होती.


आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांची लेखी परीक्षा शनिवारपासून सुरू होणार होती. लेखी परीक्षेचे काम न्यासा या संस्थेला देण्यात आलं होते. तसेच उमेदवाराच्या ओळखपत्राचा गोंधळ अद्यापही संपलेला नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा लवकर घेण्यात येतील. व परीक्षेच्या नियोजित तारीख उमेदवाराना विभागच्या संकेतस्थळावरून तसेच ईमेलद्वारे कळवण्यात येईल.