“महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि ड या प्रवर्गातील परीक्षा २५ व २६ सप्टेंबर रोजी होणार आहेत. या परीक्षेसाठी साधारणपणे गट क साठी एकूण २७४० एवढ्या जागा आपण भरत आहोत. गट ड साठी ३ हजार ५०० जागा आपण भरत आहोत. एकूण जवळपास ६ हजार २०० जागा आपण भरत आहोत. या जागांसाठी साधारणपणे एकूण आठ लाखांपेक्षा अर्ज देखील आले आहेत आणि हॉल तिकीट्स पण देण्यात आले आहेत.” अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच, “राज्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत सध्यातरी नाही.” असं देखील यावेळी त्यांनी बोलून दाखवलं ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, “२५ आणि २६ रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी माझं सर्व परीक्षार्थ्यांना विनंती आहे, आवाहन आहे. आपले परीक्षा केंद्र लक्षात ठेवा. परीक्षा केंद्रावर करोना प्रतिबंधात्मक नियमावलीचं पूर्णपणे पालन केले जाणार आहे. परीक्षा केंद्रावर जॅमर बसवले जाणार, त्यामुळे परीक्षा केंद्रावर कुठलही इलेक्ट्रिकल गॅझेट चालणार नाही. पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. राज्यभरातील पोलीस आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आलेलं आहे की, आपल्या विभागातून उपजिल्हाधिकारी व पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी परीक्षा केंद्रांवर सतत पेट्रोलिग करून, परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल याची दक्षता घेतील अशी अपेक्षा आहे. अत्यंत पारदर्शक परीक्षा घेतल्या जाणार आहेत.”

लसीकरणाची गती वाढवली तर संक्रमण जास्त होणार नाही –

याचबरोबर, “राज्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत सध्यातरी नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.ते जालन्यात बोलत होते.मात्र सणासुदीच्या काळात राज्यात होणाऱ्या गर्दीमुळे करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते, पण लसीकरणाची गती वाढवली तर संक्रमण जास्त होणार नाही.” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

“राज्यात सध्या दररोज १३ ते १४ लाख जणांना लसीकरण करण्यात येत असून डेल्टाची रुग्णसंख्या सध्या राज्यात स्थिर आहे त्यामुळे नागरिकांनी करोनाच्या नियमांचं पालन करावं असंही टोपे म्हणाले. राज्यात दररोज १५ ते २० लाख लसीकरण करण्याचा आरोग्य विभागाचा मानस असून आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरण करून घेण्यासाठी फिरत आहेत.” असं देखील टोपे यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health departments group c and d category examinations will be held on september 25 and 26 rajesh tope msr
First published on: 20-09-2021 at 22:14 IST