scorecardresearch

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची संवेदनशीलता; अपघातग्रस्त व्यक्तीला सुरक्षेसाठी असलेल्या गाडीतून पाठवले रुग्णालयात

राजेश टोपे हे देवगाव औरंगाबाद येथून जालन्याकडे जात असताना त्यांना रस्त्यात एक दुचाकीस्वार अपघात होऊन पडलेला दिसला

Health Minister Rajesh Tope rushed the injured person to the hospital in a safety vehicle

राज्याचे आरोग्यमंत्री व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबाद येथून जात असताना एका अपघातग्रस्त दुचाकी चालकाला मदत केली. देवगाव रंगारी गावाजवळ एका दुचाकी चालकाला अज्ञात वाहनाने धडक दिली होती आणि तो रस्त्यावर पडलेला होता. राजेश टोपे रात्री तिथून जात असताना त्यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी लगेचच आपला ताफा थांबवला आणि जखमी व्यक्तीला आपल्या ताफ्यातील गाडीत बसवून उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवण्यास मदत केली.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे हे देवगाव औरंगाबाद येथून जालन्याकडे जात असताना त्यांना रस्त्यात एक दुचाकीस्वार अपघात होऊन पडलेला दिसला. यावेळी राजेश टोपे  यांनी तात्काळ गाडी थांबवून अपघातग्रस्त व्यक्तीला उपचारासाठी ताफ्यातील एक्सकॉर्ट गाडीने ग्रामीण रुग्णालयात पाठवले. त्यानंतर राजेश टोपे यांनी १०८ ला कॉल करून ॲम्बुलन्सने पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवून योग्य उपचार करण्याबाबत कळवले.

यावेळी राजेश टोपे यांनी नागरिकांना आव्हान केले की, प्रवास करत असताना रस्त्यात अपघात झालेला दिसल्यास अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करून शासकीय यंत्रणांना सूचित करावे. आपल्या मदतीमुळे अपघात झालेल्या व्यक्तींना वेळेवर वैद्यकीय मदत मिळून प्राण वाचू शकतात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Health minister rajesh tope rushed the injured person to the hospital in a safety vehicle abn

ताज्या बातम्या