scorecardresearch

हिवाळ्यात नेहमी थकल्यासारखं वाटतं का? तर आजपासून ‘हे’ पदार्थां खा आणि फ्रेश राहा

हिवाळ्यात अनेकांची चयापचय क्रिया (मेटाबॉलिज्म) कमकुवत होते, त्यामुळे शरीरात ऊर्जेची कमतरता भासते

हिवाळ्यात नेहमी थकल्यासारखं वाटतं का? तर आजपासून ‘हे’ पदार्थां खा आणि फ्रेश राहा
हिवाळ्यात अनेकांना रात्रभर झोपूनही शरीरात थकवा जाणवतो आणि त्यांच्या शरीरातील सुस्तीही जात नाही. Photo : Freepik

अनेकांना बदलत्या हवामानाचा त्रास होत असतो. कारण अशा लोकांच्या शरीरावर हवामान बदलेलं तसे काही फरक जाणवतात. सध्या हिवाळा सुरु असल्याने थंडी मोठ्या प्रमाणात पडत आहे. अशा दिवसांमध्ये काही लोकांना रात्रभर झोपूनही शरीरात थकवा जाणवतो आणि त्यांच्या शरीरातील सुस्तीही जात नाही. त्यामुळे अशा लोकांना सतत अंथरुणावर झोपायला आवडतं. शिवाय ते हिवाळ्यात कामं करण्याची, स्वयंपाक करण्याची किंवा घराबाहेर पडण्याचं धाडही ते लोक करत नाहीत. त्यांना फक्त अंथरुणावर झोपायला, उबदार कपडे घालून निवांत पडायला आवडतं. मात्र, या थकवा आणि सुस्तीचा तुमच्या दैनंदिन जीवनावरही गंभीर परिणाम होत असतो.

जेपी हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार, डॉ. ए. झीनत यांच्या मते, अनेक लोकांना सतत थकवा आणि सुस्तपणा जाणवतो. थकवा आणि सुस्ती येण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये काही लोक आरामदायी जीवन आणि लठ्ठपणामुळे सुस्त असतात. तर शरीरात लोह आणि व्हिटॅमिन बी 12 ( vitamin b12)च्या कमतरतेमुळेही थकवा येऊ शकतो. महिलांमध्ये थायरॉईड हार्मोनच्या कमतरतेमुळेही अशा प्रकारची समस्या उद्भवते.

हेही वाचा- हिवाळ्यात दातांमध्ये वेदना का जाणवतात? अशावेळी दातांची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या

हिवाळ्यात अनेकांची चयापचय क्रिया (मेटाबॉलिज्म) कमकुवत होते, त्यामुळे शरीरात ऊर्जेची कमतरता भासते. शरीरातील अन्नाचे ऊर्जेत रूपांतर होण्याला चयापचय म्हणतात. शरीराला काम करण्यासाठी, अन्न पचवण्यासाठी, रक्ताभिसरण सुरळीत करण्यासाठी, हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी भरपूर ऊर्जा लागते, त्यामुळे चयापचय वाढवणे आवश्यक असते. मेटाबॉलिज्म कमी असताना थकवा आणि सुस्ती जाणवते. तुम्हालाही हिवाळ्यात एनर्जीने परिपूर्ण राहायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला आहारात काही बदल करणं आवश्यक आहे. शिवाय तुमच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करावा लागेल ज्यामुळे ऊर्जा वाढेल आणि आणि शरीराती सुस्ती निघून जाईल.

प्रथिनयुक्त आहार (Consume protein diet) –

हेही वाचा- हिवाळ्यात बाथरुममध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण का वाढते? धोका टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

कानपूरच्या गॅस्ट्रो लिव्हर हॉस्पिटलचे डॉ विनोद मिश्रा यांच्या मते, मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी प्रोटीनयुक्त आहार घ्यायला पाहिजे. जेवणामध्ये प्रथिनांचे स्रोत समाविष्ट केले पाहिजेत. शरीराच्या प्रत्येक अवयवाची देखभाल करण्यासाठी प्रथिनांची गरज असते. यासाठी तुम्ही हिवाळ्यात शेंगदाणे, हिरवी मूग डाळ, हरभरा आणि पनीर या पदार्थांचे सेवन करायला हवं.

आहारात मसाल्यांचा समावेश –

हिवाळ्यात या मसाल्यांचा मर्यादित वापर केल्याने तुमची सुस्ती दूर होऊ शकते. मसाल्यांमध्ये हिरवी मिरची, लाल तिखट, काळी मिरी आणि तमालपत्र यांचा समावेश करावा. तर दालचिनीचे सेवन केल्याने चयापचय क्षमता वाढते आणि शरीर निरोगी राहते.

हेही वाचा- …तर डायबिटीजमुळे येऊ शकते अंधत्व; ‘या’ ५ गोष्टींकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

गरम पाणी –

हिवाळ्यात गरम पाणी पिल्याने चयापचय वाढते आणि शरीर हायड्रेट राहते. गरम पाण्यामुळे शरीरातील आळस आणि थकवा दूर होतो.

सलगम –

सलगम हे थंड वातावरणात आरोग्यदायी अन्न आहे जे शरीराला डिटॉक्स करते आणि शरीर निरोगी ठेवते. त्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे रोग प्रतिकारशक्ती आणि चयापचय क्षमता वाढवते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 18:36 IST

संबंधित बातम्या