दिलीप वळसेपाटील यांना ह्रदयविकाराचा झटका

आाता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

पवारांविषयींच्या आठवणींना उजाळा देताना वळसे पाटील यांच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांना ह्दयविकाराचा झटका आला असून, त्यांना भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केल आहे. दरम्यान, आाता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी  दिली आहे.
कात्रज येथे कात्रज दूध संघाच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पवारांविषयींच्या आठवणींना उजाळा देताना वळसे पाटील यांच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांनतर त्यांना तात्काळ जवळच्या भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारही त्यांच्यासोबत उपस्थित आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Heart attack to dilip walse patil