पुणे : निरभ्र आकाश आणि देशाच्या उत्तर-पश्चिम भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. विदर्भात उष्णतेची लाट आली असून, ती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

 विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. मुंबई परिसरासह कोकण विभागातील किमान तापमान अद्यापही सरासरीपुढे आहे.

Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी
heat stroke patients maharashtra,
राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ७७ वर, मागील चार दिवसांमध्ये ३६ रुग्ण वाढले
Heat stroke, Maharashtra
राज्यावर उष्माघाताचे संकट! जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे वाढला…
maharashtra, Temperature rise, warning, heat wave, intensify, konkan, vidarbha, marathwada, summer, dry weather, sweating,
राज्यात तापमानवाढीचा इशारा, उष्णतेच्या झळा आणखी तीव्र होणार

पुढील दोन दिवसांनंतर मात्र तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे.  राज्यात १३ मार्चपासून तापमानातील वाढ सुरू झाली होती. राजस्थानपासून गुजरातपर्यंत असलेल्या उष्णतेच्या लाटेचा परिणाम म्हणून मुंबई परिसरासह कोकण विभागात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली होती. मुंबई परिसराचे कमाल तापमान सरासरीच्या तुनलेत ५ ते ६ अंशांनी वाढले होते. सध्याही मुंबई परिसरातील कमाल तापमान सरासरीच्यचा तुलनेत अधिक आहे. राजस्थान, दक्षिण मध्य प्रदेश आणि तेलंगणा आदी राज्यांमध्ये सध्या उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. विदर्भातही काही भागात उष्णतेची लाट आली आहे. जवळपास सर्वच भागातील कमाल तापमान ४० अंशांपुढे गेले आहे.

मराठवाडय़ात  सर्वच भागांतील कमाल तापमान ४० अंशांपुढे गेले आहे. त्यामुळे या भागातही उन्हाचा चटका तीव्र आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सोलापूर आदी भागांतही कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून, सरासरीच्या तुलनेत ते ३ ते ४ अंशांनी वाढले आहे. राज्यात आणखी एक ते दोन दिवस तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. दोन दिवसांनंतर कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

मुंबई (कुलाबा) ३२.६, सांताक्रुझ ३६.९, रत्नागिरी ३३.२, पुणे ३९.०, जळगाव ४२.६, कोल्हापूर ३९.५, महाबळेश्वर ३३.१, नाशिक ३९.१, सांगली ४०.४, सातारा ३८.५, सोलापूर ४१.६, औरंगाबाद ४०.०, परभणी ४१.२, नांदेड ४०.०, अकोला ४२.७, अमरावती ४१.४, बुलढाणा ३९.८, ब्रम्हपुरी ४०.४, गोंदिया ३९.८, नागपूर ४०.०, वर्धा ४१.४

तापभान.. अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा आदी भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. पुढील दोन दिवस विदर्भातील काही भागात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कोकणात पावसाचा अंदाज..

बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होते आहे. त्याचा परिणाम म्हणून दक्षिणेकडील काही भागामध्ये पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने दक्षिण कोकण भागातही तुरळक ठिकाणी १९, २० मार्चला हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.