चाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान! ६०० जनावरे वाहून गेली; १० लोकांच्या मृत्यूची शक्यता

 राज्यातील जळगाव मधील चाळीसगाव तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे

heavy rain in maharashtra today
चाळीसगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार (photo@mangeshchavanofficial fb)

हवामान खात्याने अलर्ट दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी आज पावसाला सुरवात झाली आहे. राज्यातील जळगाव मधील चाळीसगाव तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. या तालुक्यातील अनेक गाव पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसामुळे या तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जवळपास ५०० ते ६०० जनावरे वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच काही लोक वाहून गेल्याची देखील माहिती मिळत आहे. पुरामुळे तालुक्यात मोठं नुकसान झाल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

तालुक्यात जवळपास पंधरा गावांमध्ये पाणी शिरंल आहे. तसेच जणावरे वाहून गेल्याच्या वृत्ताला प्रशासनाने दुजोरा दिला आहे. तालुक्यात अनेक गावांमध्ये अद्यापही पाणी साचलेलं आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

वाहतूकीवर परिणाम

तालुक्यात अनेक पुल देखील पाण्याखील गेली आहेत. त्यामुळे याचा वाहतूकीवर परिणाम मोठा परीणाम झाला आहे. हे पाणी नागरी वस्तींमध्ये शिरल्यामुळं अनेक ठीकाणी बाजारपेठा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. मोठी जीवित आणि वित्तहानी झाल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे.

हेही वाचा – मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढील २४ तास पाऊस तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार कोसळणार

लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता

आमदार मंगेश चव्हाण म्हणाले, स्थानिक लोकांशी माझं बोलणं झाल आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत आम्ही घाटात आहोत. या ठीकाणी मोठ्या दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे रस्ता मोकळा करण्याचे काम सुरु आहे. ५०० ते ६०० गुरं पाण्यामध्ये वाहून गेली आहेत. तर काही दगावली आहेत. तसेच सकाळपासून ३ ते ४ मृतदेह मी बघितले आहेत. त्यामुळे ८ ते १० लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व प्रशासन कामाला लागलं आहे. या पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. पंचनामे केल्यानंतर ते कळेल. पंचनामे करण्याच्या सुचना महसूल विभागाला केल्या आहेत. तालुक्यातील ८ ते १० गावांना या पुराचा फटका बसला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Heavy rain in maharashtra today flood situation in chalisgaon taluka death of civilians animals carried away srk

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या