सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्हात सरासरी ११४ मि.मी एवढा पाऊस नोंदला गेला आहे. नदी नाल्यांना पूर आला असून माणगाव खोऱ्यातील आजिंवडे गावात गेलीली वस्तीची एसटी बस दुकानवाड येथे अडकली आहे.

कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील नदी नाल्यांना पूर आल्याने वेंगुर्ला आगारची अंजीवडे वस्ती बस क्र १६७५ ही काल शुक्रवारी रात्री अंजीवडेला गेली होती. आज शनिवारी सकाळी येताना दुकानवाड येथे पुलावर पाणी आल्याने थांबली आहे.

हेही वाचा – Raj Thackeray : “रोज येणाऱ्या अत्याचारांच्या वृत्तांमागे राजकारण की येणाऱ्या निवडणुका?”, राज ठाकरेंचा थेट प्रश्न; म्हणाले, “सरकारला बदनाम…”

सिंधुदुर्ग जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल शुक्रवारी रात्रीपासून पाऊस कोसळत आहे. जिल्हात सरासरी ११४ मि.मी एवढा पाऊस नोंदला गेला आहे. सकाळी नोंद झालेला तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे आहे.

हेही वाचा – Raj Thackeray: मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस यांच्या विरोधात उमेदवार देणार का? राज ठाकरे म्हणाले, “यावेळी…”

देवगड ११८.४ मि.मी, मालवण १३०.४ मि.मी, सावंतवाडी ११४.३ मि.मी, वेंगुर्ले ११२.७ मि.मी, कणकवली ७१.१ मि.मी, कुडाळ १५६.१ मि.मी, वैभववाडी ६४.५ मि.मी, दोडामार्ग ७५.५ एवढा पाऊस नोंदला गेला आहे.