scorecardresearch

दरडप्रवण भागातील नागरीकांचे स्थलांतरण

पोलादपूर तालुक्यातील चोळई गावात दरड कोसळल्याने, २० कुटूंबातील ८५ जणांचे स्थलांतरण करण्यात आले.

rain villagers migration
दरडप्रवण भागातील नागरीकांचे स्थलांतरण

रायगड – पोलादपूर तालुक्यातील चोळई गावात दरड कोसळल्याने, २० कुटूंबातील ८५ जणांचे स्थलांतरण करण्यात आले. महाड तालुक्यातील बावळे गावात जमिनीला भेगा गेल्याने, ४५ कुटूंबातील ७० जणांचे स्थलांतरण करण्यात आले. इंदापूर येथे दोन घरात पाणी शिरल्याने तेथील नागरीकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.

पाहा व्हिडीओ –

दासगाव, दाभोळ, तुळोशी, महोत भिसेवाडी, भिवघर,  वाघेरी आदिवासीवाडी, कसबे शिवथर आबेनळी, कोंडीवते, गोठे बुद्रुक १६९ कुटूंबातील ५८० जणांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. पोलादपूर तालुक्यातील १३ गावातील १७० कुटूंबातील ३९४ जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Heavy rain migration citizens areas ground village villagers ysh

ताज्या बातम्या