scorecardresearch

Premium

महाराष्ट्रासाठी पुढचे काही तास महत्त्वाचे, मुंबई-पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, घराबाहेर न पडण्याचा इशारा

मुंबईसह राज्यात मान्सून आता पूर्णपणे सक्रिय झाला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय.

Mumbai Heavy Rainfall
पावसाच्या दृष्टीने महाराष्ट्रासाठी पुढचे काही तास महत्त्वाचे आहेत. (PC : PTI)

महाराष्ट्रात मोसमी पाऊस सक्रीय झाला असून मुंबई शहर, तसेच उपनगरांत बुधवारी (२६ जुलै) रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. हवामान विभागाने मुंबईला शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर मुंबईसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे. हवामानशास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी सांगितलं की, पुढच्या २४ तासांत राज्यात मुसळधार पाऊस होईल. तर, राज्यासाठी पुढचे तीन ते चार तास खूप महत्त्वाचे असल्याचं भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सांगितलं आहे.

आयएमडीच्या पुणे विभागाचे अध्यक्ष कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं आहे की, मुंबई, ठाणे, रायगड, पुणे-साताऱ्यातील घाट परिसर, कोल्हापूरचा काही भाग, हिंगोली, यवतमाळ, परभणी आणि लगतच्या भागात येत्या ३ ते ४ तासांत मुसळधार पाऊस पडेल.

intensity rain increase Maharashtra next 48 hours
राज्यात पुढील ४८ तासात पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रातून मान्सून ४ ऑक्टोबरपासून परतण्याची शक्यता
Monsoon Maharashtra
मान्सूनचा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला! देशाच्या काही राज्यांमधून परतीची वाट…
prakash-ambedkar
राज्यात मैत्री अन् अकोला जिल्ह्यात कुरघोडी, स्थानिक पातळीवर समन्वयाचा अभाव
maharashtra rain update, yellow alert given in maharashtra, rain yellow alert for 3 days
सावधान! तीन दिवस राज्याच्या वेगवेगळ्या भागात ‘यलो अलर्ट’

हवामान विभागाने मुंबईला गुरुवारी सकाळी ८.३० पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला होता. परंतु त्यानंतरही पावसाचा वेग कायम असल्याचं पाहून हवामान विभागाने आता शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबईसह, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, वसई-विरार भागात मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे लोकांनी घराबाहेर पडू नये, असं सांगण्यात आलं आहे.

हे ही वाचा >> “आम्ही आठ माळे चढू शकत नाही”, ‘त्या’ प्रश्नावर भरत गोगावलेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोल

हवामानशास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी सांगितलं की, राज्यातील कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकल्याने पुढील २४ तासांत राज्यात मान्सून अतिसक्रिय असेल, तर त्यानंतरच्या २४ तासांत मान्सून सक्रिय असेल. कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट विभाग आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर पावसाचं प्रमाण कमी होईल.

हे ही वाचा >> बेफाम पावसामुळे मुंबईकरांना २६ जुलैची आठवण, ‘हे’ फोटो पाहिले की आजही येतो अंगावर काटा

बुधवारी सकाळी ८.३० ते गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत मुंबई शहर, उपनगरात पडलेला पाऊस

कुलाबा- २२३.२ मिलिमीटर
सांताक्रूझ – १४५.१ मिलिमीटर
बांद्रा – १०६.० मिलिमीटर
राम मंदिर – १६१.० मिलिमीटर
चेंबूर- ८६.५ मिलिमीटर
भायखळा- ११९.० मिलिमीटर
सीएसएमटी – १५३.५ मिलिमीटर
सायन – ११२.० मिलिमीटर

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Heavy rainfall in mumbai maharashtra imd extends red alert till friday morning asc

First published on: 27-07-2023 at 16:31 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×