मुंबईमध्ये कालपासून (गुरुवार) मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यात आता पुढील चार ते पाच तासांत देखील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबईत जोरदार पावसाची वर्तवण्यात आली आहे. कालपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे अनेक ठिकाणच्या सखलभागात पाणी साचून मुंबईकरांना फटका बसला. गेल्या महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलैच्या पूर्वसंध्येपासून दमदार हजेरी लावत मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडविली.

महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची धावपळ –

जून महिना कोरडा गेल्यामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील जलासाठा कमालीचा खालावला आहे. परिणामी, मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठ्यामध्ये १० टक्के पाणी कपात लागू करावी लागली. जुलैच्या पूर्वसंध्येपासून मुंबईत पावसाने जोर धरला असून काही भागात अतिमुसळधार पाऊस कोसळला. परिणामी, सखलभाग जलमय होऊन सर्वांचीच तारांबळ उडाली. तर साचणाऱ्या पाण्याचा झटपट निचरा व्हावा यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली होती.

Temperature in Mumbai today and tomorrow at 37 degrees
मुंबईतील तापमानाचा पारा आज, उद्या ३७ अंशावर
15 percent water cut across Mumbai till March mumbai print news
५ मार्चपर्यंत संपूर्ण मुंबईत १५ टक्के पाणी कपात; पिसे उदंचन केंद्रातील ट्रान्सफॉर्मर सुरु होण्यास वेळ लागणार
Mumbai Municipal Corporation has implemented a 10 percent water cut across Mumbai from March 1 mumbai
मुंबईवर पाणीकपातीचे संकट; पुरवठ्यात १ मार्चपासून १० टक्के कपातीची शक्यता
people, blocked Chinchoti Kaman Bhiwandi road, protest
चिंचोटी कामण-भिवंडी रस्त्याची दुरावस्था, नागरिकांचे दोन तास रास्ता रोको 

मुंबईप्रमाणेच राज्यातही पावसाने दडी मारली होती. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हांमध्ये तुलनेत पाऊस कमी होता. परंतु मुंबईत पावसाचा मागमूसही नव्हता. परिणामी, जूनअखेरपर्यंत मुंबई शहरात ४४ टक्के, तर उपनगरांमध्ये ५१ टक्के पावसाची तूट नोंदली गेली. मात्र आता दमदार हजेरीमुळे ही तूट भरून निघेल असा विश्वास व्यक्त होत आहे.

नागरिकांनी पावसाचा अंदाज घेऊन सुरक्षितस्थळी थांबावे –

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई येथे पावसाचे मध्यम ते मोठे ढग जमा झाले आहेत. त्यामुळे पुढील चार ते पाच तासांत जोरदार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी पावसाचा अंदाज घेऊन सुरक्षितस्थळी थांबावे, असे आवाहन हवामान अभ्यासकांकडून करण्यात येत आहे.

आजही मुसळधार पावसाची शक्यता –

मुंबई आणि उपनगरांमध्ये ३० जून रोजी अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. तर, आज देखील (शुक्रवार) मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. आज सकाळी साडेआठवाजेपर्यंत (मागील २४ तासांत) कुलाब्यामध्ये २२७ मिमी, तर सांताक्रुझमध्ये १७५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.