वर्धा : मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका आर्वी तालुक्यास बसला आहे. काही ठिकाणी गावकऱ्यांचे स्थलांतर करावे लागले आहे. तालुक्यातील 54 गावातल्या 265 कुटुंबाचे नुकसान झाले. अनेक घरे व गुरांच्या गोठ्याची पडझड झाली असून एक हजारावर हेक्टर पिकांची हानी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

सलग दहा तास पाऊस बरसल्याने देऊळवाडा गावातील गावकऱ्यांचे लगतच्या शाळेत स्थलांतर करण्यात आले. संकटात सापडलेल्या कुटुंबास धान्य वाटप करण्यात येणार आहे. तसेच सानुग्रह अनुदान कुटुंबातील संख्येनुसार देण्यात येणार असल्याचे तहसीलदार चव्हाण यांनी सांगितले. वाथोडा, वाढोना, विरुळ, रोहना, खरंगना या गावांना फटका बसला. रोहना गावात एकाच रात्रीत 154 मिमी पावसाची नोंद झाली आहे.