कराड : कोयना धरणक्षेत्रात जोरदार पावसाबरोबरच धरणातील पाण्याची आवकही झेपावली असून, कोयना धरणाचा जलसाठा ६० टक्क्यांच्या पोहचला आहे. कण्हेर, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, आंबेआहोळ, सर्फनाला, धामणी आदी जलाशय काठोकाठ भरले असून, काही जलाशयांतून विसर्ग सुरू आहे.

सध्या कोयना धरणातील पाण्याची आवक प्रतिसेकंद ३०,८०४ घनफूट झाली असून, गेल्या २४ तासांत धरणात २.६६ टीएमसी पाण्याची आवक होऊन जलसाठा ६२.४८ टीएमसी (जलाशय क्षमतेच्या ५९.४८ टक्के) झाला आहे. पावसाचा हा जोर असाच राहिल्यास येत्या दोन-तीन दिवसांत कोयना धरण दोन तृतीयांश भरणार आहे. शुक्रवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयनेच्या पाणलोटात एकूण १,७१७.६६ मिमी (वार्षिक सरासरीच्या ३४.३५ टक्के) पाऊस झाला आहे. त्यात कोयनानगराला १,७२८, नवजाला १,६२० आणि महाबळेश्वरला १,७०४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुरुवारी दिवसभरात कुंभी धरण ५८ मिमी, वारणा १४, कडवी १३, उरमोडीत ११ मिमी पावसाची नोंद आहे. पश्चिम घाटक्षेत्रातील सर्वच जलाशय परिसरात, तसेच बहुतेक महसूल मंडलात पावसाच्या सरींवर सरी कोसळत आहेत. त्यात दिवसभरात दाजीपूरला सर्वाधिक ६७ मिमी, खालोखाल गगनबावडा ६४ मिमी, रेवाचीवाडी ५८ मिमी पाथरपुंज व सावर्डे येथे ४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.