बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या ‘बिइंग ह्य़ूमन’ प्रतिष्ठानने मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त जिल्ह्य़ांना ६ ते ३१ मे या कालावधीत प्रतिष्ठानच्या वतीने पाण्याचे २५०० टँकर पुरविण्यात येणार आहेत. एका टँकरची क्षमता दोन हजार लिटर इतकी आहे, असे औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांना प्रतिष्ठानच्या वतीने ई-मेलद्वारे कळविण्यात आले आहे.
विभागीय आयुक्तांकडून आपल्यालाही ई-मेलद्वारे ही माहिती कळविण्यात आल्याचे बीडचे निवासी जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांनी सांगितले. बीड जिल्ह्य़ास पाण्याचे ७५० टँकर पुरविण्यात येणार आहेत. उस्मानाबाद आणि जालना येथे प्रत्येकी ५०० टँकर, तर औरंगाबाद आणि नांदेडला प्रत्येकी २५० टँकर पुरविण्यात येणार आहेत.