दोन वर्षांपूर्वी हिंगणघाटमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुण प्राध्यापिकेला जिवंत जाळण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन आज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाची सुनावणी बुधवारी अर्थात ९ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाली होती. त्यानंतर अंतिम निकाल न्यायालयाने आजसाठी राखून ठेवला होता. आज न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावल्याची माहिती सरकारी पक्षाचे वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.

“आज न्यायालयाने आरोपी विकेश नगराळे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ३ फेब्रुवारी २०२०ला त्याला अटक करण्यात आली होती. पण या दोन वर्षांच्या कालावधीची त्याला शिक्षेत सूट मिळणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार मरेपर्यंत जन्मठेप असा जन्मठेपेचा अर्थ होत असल्यामुळे आणि विकेश नगराळेच्या गुन्ह्याचं क्रौर्य पाहून त्याला २ वर्षांची सूट मिळणार नाही. शिवाय त्याला ५ हजारांचा दंड अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी सुनावला आहे”, अशी माहिती सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.

nagpur wife murder for 200 rupees marathi news
दोनशे रुपयांसाठी पत्नीची कुऱ्हाडीने केली हत्या, आता मागितली शिक्षेत सुट; न्यायालयाने…
Hindu Marriage Act
“हिंदू विवाह कायद्यांतर्गत ‘कन्यादान’ आवश्यक नाही, तर…”; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय
Nagpur
नागपूर : पाच जणांची हत्या करणाऱ्या विवेक पालटकरची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाकडून कायम
Accused sentenced to death for murdering four persons on suspicion of wife character
पत्नीसह कुटुंबातील चौघांचा खून; शिरोळ तालुक्यातील आरोपीस फाशीची शिक्षा

बुधवारी हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं निकाल आजसाठी राखून ठेवला होता. आज संध्याकाळी पाचच्या सुमारास या निकालाचं वाचन करण्यात आलं.

काय घडलं होतं त्या दिवशी?

हिंगणघाटच्या श्रीमती कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतिशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक असलेली पीडिता ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला आली. आरोपी विकेश नगराळे तिच्या नेहमीच्या मार्गावर दबा धरून बसला होता. ती दिसताच त्याने दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात ही तरुणी ४० टक्के होरपळली. नागपूमधील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तिची प्राणज्योत मालवली. एकतर्फी प्रेमातून आरोपीने हे कृत्य केल्याचं नंतर तपासात निष्पन्न झालं. या घटनेनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.

४२६ पानांचं आरोपपत्र, ६४ सुनावणी आणि २९ साक्षीदार; हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपी दोषी; उज्वल निकमांचा युक्तिवाद

दरम्यान, या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाकडून तब्बल ४२६ पानांचं दोषारोपपत्र, ६४ सुनावणी आणि २९ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली.

आरोपीची पार्श्वभूमी काय?

आरोपीचे नाव विकेश नगराळे असं आहे. आरोपीचं लग्न झालं असून त्याला एक मुलगी देखील आहे. ही घटना घडली तेव्हा नुकताच तो रेल्वेत नोकरीला लागल्याचं सांगण्यात आलं होतं. घटनेच्या तीन महिने आधी त्याने पीडितेला त्रास दिला होता. याआधी तिचा जुळलेला विवाह तुटल्याने पीडितेच्या वडिलांनी आरोपीला खडसावलं देखील होतं. मात्र, तरी देखील आरोपी विकेश नगराळेनं पीडितेला त्रास देणं सुरूच ठेवलं होतं. अखेर याचं पर्यवसान ३ फेब्रुवारी रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेमध्ये झालं.