पुणे : राज्यातील शाळांना २ मे ते १२ जून या कालावधीत उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. आगामी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील शाळा १३ जूनपासून, तर विदर्भातील शाळा २७ जूनपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे दिली.


करोनामुळे शाळा उशिरा सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा घेण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यानंतर उन्हाळी सुटीबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता येण्यासाठी उन्हाळी सुटी आणि शाळा सुरू करण्यासंदर्भात शासन स्तरावरून निर्णय घेण्यासाठीचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर आणि माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवला होता. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने सोमवारी परिपत्रक प्रसिद्ध केले.

Summer vacation has been announced for schools in the state When will the school start
राज्यातील शाळांना उन्हाळी सुटी जाहीर… शाळा सुरू कधी होणार? शिक्षण विभागाने दिली माहिती…
mining projects in sindhudurg
सिंधुदुर्गातील खनिज प्रकल्प कायमचे बंद व्हावेत; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणवाद्यांना अपेक्षा
Law College Student Attendance
विधी महाविद्यालय विद्यार्थी उपस्थिती : ७५ टक्के उपस्थितीच्या नियमाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्याची न्यायालयाला मागणी
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ


राज्यातील पहिली ते नववी, अकरावीचा निकाल ३० एप्रिल रोजी किंवा त्यानंतरच्या सुटीच्या कालावधीत जाहीर करता येईल. मात्र तो निकाल विद्यार्थी, पालकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहील. शाळांतून उन्हाळ्याची आणि दिवाळीची दीर्घ सुटी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव किंवा नाताळ यांसारख्या सणांवेळी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिकचे शिक्षण अधिकारी यांच्या परवानगीने घ्यावी. शैक्षणिक वर्षातील सुट्या एकूण ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.