Explore the top honeymoon places in Maharashtra and plan your romantic trip with this 2026 travel guide : लग्नाचे विधी पार पडले की वेध लागतात ते हनिमूनचे! आपल्या जोडीदारासोबत निवांत आणि रोमँटिक वेळ घालवण्यासाठी महाराष्ट्रात निसर्गाचा मोठा वरदान लाभलेली अनेक ठिकाणे आहेत. कमी खर्चात आणि निसर्गाच्या कुशीत असलेल्या सर्वोत्तम डेस्टिनेशन्स तुम्हीही शोधत आहात का? महाराष्ट्रात हनिमूनसाठी अनेक निसर्गरम्य आणि रोमँटिक ठिकाणे आहेत, जी समुद्रकिनारे, थंड हवेची ठिकाणे (Hill Stations) आणि ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध आहेत. त्यानुसार, काही सर्वोत्तम ठिकाणांची माहिती आम्ही आज तुम्हाला देत आहोत.

महाबळेश्वर

हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हनिमून ठिकाण आहे. येथील स्ट्रॉबेरी फार्म्स, वेण्णा लेक आणि विल्सन पॉइंट पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत. जोडीदारासोबत रोमँटिक स्टेसाठी Rockford Resort Mahabaleshwar सारखे पर्याय उपलब्ध आहेत.

लोणावळा आणि खंडाळा

मुंबई आणि पुण्यापासून जवळ असल्याने हे जोडप्यांचे आवडते ठिकाण आहे. येथे राहण्यासाठी Fariyas Resort किंवा निसर्गाच्या सानिध्यात असलेले The Machan – Treehouse Resort सारखे उत्तम पर्याय आहेत.

माथेरान

आशियातील एकमेव वाहनमुक्त थंड हवेचे ठिकाण असल्याने येथे शांतता आणि प्रदूषणमुक्त वातावरण मिळते. कमी बजेटमध्ये हनिमूनसाठी हे उत्तम ठिकाण आहे.

अलिबाग

अलिबागला महाराष्ट्रातील ‘मिनी गोवा’ असेही म्हटले जाते. समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक किल्ल्यांसाठी हे प्रसिद्ध असून येथे अनेक रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत.

गणपतीपुळे

शांत समुद्रकिनारा आणि देवदर्शनासाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. महाराष्ट्रातील अनेक जोडपी लग्नानंतर गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला येथे जातातच.

मालवण आणि तारकर्ली

ज्यांना वॉटर स्पोर्ट्स (उदा. स्कुबा डायव्हिंग) आवडतात, त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. सध्या कोकण हे हनिमून डेस्टिनेशनसाठी नव्याने तयार होत असलेले पर्यटन स्थळ आहे. अथांग समुद्र आणि वॉटर स्पोर्ट्ससारख्या अनेक सुविधा कोकणात सुरू झाल्याने अनेक पर्यटक कोकणाचा पर्याय निवडतात. खासकरून मालवण आणि तारकर्लीसारख्या ठिकाणी पर्यटकांची तुफान गर्दी होतेय.

नाशिक

येथील द्राक्षमळे (Sula Vineyards) आणि आल्हाददायक वातावरणामुळे हे हनिमूनसाठी प्रसिद्ध होत आहे.  शांतता आणि प्रायव्हसीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. जर तुम्हाला तुमच्या नवीन प्रवासाची सुरुवात देवदर्शनाने करायची असेल, तर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आणि पंचवटी ही ठिकाणे जवळच आहेत.

भंडारदरा

धबधबे आणि निसर्ग सौंदर्यासाठी ओळखले जाणारे हे ठिकाण जोडप्यांसाठी निवांत वेळ घालवण्यासाठी योग्य आहे.

लवासा

पुण्याजवळील हे एक नियोजित शहर असून येथील युरोपियन शैलीतील वास्तुकला आणि तलावाचे दृश्य रोमँटिक वातावरण निर्माण करते.