scorecardresearch

सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महिलांचा सन्मान

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने  विविध क्षेत्रातील  उल्लेखनीय काम केले आहे अशा महिलांचा सन्मान करण्यात आला. 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून

वाई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने  विविध क्षेत्रातील  उल्लेखनीय काम केले आहे अशा महिलांचा सन्मान करण्यात आला.  पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिनाचे अयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमामध्ये सातारा जिल्हयातील विविध क्षेत्रातील ज्या महिलांनी उल्लेखनीय काम केले अशा महिलांचा उपविभागीय पोलीस अधिकारी (वाई) डॉ. शीतल जानवे-खराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक (तळबीड पोलीस ठाणे) श्रीमती जयश्री पाटील (सातारा नगराध्यक्षा), माधवी कदम, (राखीव पोलीस निरीक्षक आलदर) यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

   यावेळी गीता विलास पवार (तपासे) वैदयकीय विभागातील अधिपरिचारिका रेखा गणपत वाजे, राज्य परिवहन विभागातील वाहक, सातारा जिल्हा पोलीस दलातील दिपाली निलेश यादव, कृषी माल उदयोजक कांचन हणमंत कुचेकर, प्लंबर कामकरणारी महिला उज्वला बाळु मोरे, इलेक्ट्रीशियन अरुणा अरिवद फाळके, शाळा बस चालक महिला सुजाता ज्ञानदेव सोनटक्के,सफाई कामगार अनिता जयवंत खुडे,अंगणवाडी सेविका सुनिता साळुखे,आर.डी.सी.परेड राजपथ दिल्ली,डॉग युनिटच्या महिला पोलीस नाईक सोनाली बनकर,कोर्ट कामकाज पाहणाऱ्या सुवर्णा सुनील निकम, बामनोली येथील दुर्गम भागातील मुली की ज्यांना नावेतून प्रवास करून शिक्षण घ्यावे लागते अशा मुली सुरेखा अशोक संकपाळ, सारिका अशोक संकपाळ, पारू श्रीरंग संकपाळ, प्रियांका श्रीरंग संकपाळ, शीतल पवार सरपंच सैदापूर यांच्यासह विविध क्षेत्रातील आपले नैपुण्य प्राप्त महिलांचा सन्मान करण्यात आला. पोलीस दलाच्या वतीने महिला अत्याचारासंदर्भात कायद्याविषयाचे सखोल मार्गदर्शन सहायक पोलीस निरीक्षक  अनिता आमंदे-मेणकर यांनी केले तसेच शाळा महाविद्यालयातील मुलींनी स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमास सुमारे २६४ विविध महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. आज महिला दिनानिमित्त साताऱ्यातील शाहुपुरी व वाई पोलीस ठाण्याचे कामकाज पोलीस ठाण्याचे कामकाज महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांभाळले. स्थानिक गुन्हे शाखा साताराचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, भरोसा सेल यांनी कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Honoring behalf police force occasion international womens day ysh

ताज्या बातम्या