अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द येथे चक्क घोड्याचे श्राद्ध घातले आहे. त्यामुळे या मालकाच्या आपल्या घोड्यावरील प्रेमाची तालुक्यात चांगलीच चर्चा रंगलली आहे. प्राण्यांविषयी आपुलकी व माणुसकीची भावना घोड्याच्या माध्यमातून बघायला मिळाली.

पारेगाव खुर्द येथील दत्तू मोकळ यांच्या पवन या घोड्याचे अल्पशा आजाराने निधन झाले. या घोड्याच्या निधनामुळे मोकळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या घरातील व्यक्ती गेल्याप्रमाणे त्यांनी चक्क घोड्याचे श्रद्धा घातले व आपल्या घरामध्ये दहा दिवसांचा दुखवटा करत त्यांनी कांदळकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते. यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांनी श्रद्धांजली देण्यासाठी गर्दी केली होती. १० दिवसांनी पाहुण्यांना बोलवून घोड्याची दशक्रिया पार पडली. या आगळ्या-वेगळ्या प्राणीप्रेमाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.

Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
Tipeshwar Sanctuary
VIDEO : टिपेश्वर अभयारण्यात वाघच नाही, तर रानकुत्र्यांसह ‘या’ वन्यप्राण्यांना पर्यटकांची पसंती
girlfriend who murder lover
कोल्हापूर : प्रियकराचा खून करून मृतदेह जाळणाऱ्या प्रेयसीसह आरोपींच्या हातात बेड्या; आजरा पोलिसांची दमदार कामगिरी

पांडुरंग बाबुराव मोकळ, बाबासाहेब पांडुरंग मोकळ, पांडुरंग मोकळ यांचा पवन नावाचा घोडा होता. “त्या घोड्यामुळे आमच्या घरात भरभराट सुख-शांती वाढत गेली. त्याच्या अकाली निधनामुळे आमच्या घरावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे, अशी भावना दत्तू मोकळ यांनी दिली. लहान बाळाच्या प्रमाणे त्याचे संगोपन करता आम्ही त्याला लहानाचा मोठा केला व तो आमच्या घरातील एक सदस्य होता. त्याच्या स्मरणार्थ आम्ही छोटे स्मारक बांधणार आहोत, जेणेकरून येता-जाता त्याची आठवण येत राहील,” अशी माहिती मोकळ परिवाराने दिली आहे.