Step-by-step Process to Check Maharashtra HSC Result 2026: महाराष्ट्र HSC निकाल 2026 हा या वर्षी बारावीची परीक्षा दिलेल्या महाराष्ट्रातील १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आणि प्रतीक्षेचा विषय आहे. बारावीच्या अधिकृत निकालाची तारीख, लिंक, तसंच स्टेप बाय स्टेप निकाल कसा पाहायचा याची सगळी माहिती या लेखातून जाणून घेऊ या…

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल (HSC Result Date & Time)

HSC (12वी) निकाल शनिवार, २ मे २०२६ रोजी दुपारी १:०० वाजता जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) ने गुरुवारी ही घोषणा केली. राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले, “विद्यार्थ्यांना शनिवारी दुपारी १ वाजल्यापासून आपला निकाल ऑनलाइन पाहता येईल.” त्यांनी हेही सांगितले की यावर्षीचा HSC निकाल मागील वर्षाच्या तुलनेत ३ दिवस आधी जाहीर होत आहे, कारण मागील वर्षी तो ५ मे रोजी जाहीर झाला होता.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट्स hscresult.mkcl.org आणि mahahsscboard.in या आहेत.

महाराष्ट्र HSC निकाल 2026 कसा पाहायचा – स्टेप बाय स्टेप

पद्धत १: mahresult.nic.in

  • तुमचं ब्राउझर उघडा आणि mahresult.nic.in ही वेबसाइट ओपन करा.
  • होमपेजवर “HSC March 2026 Examination Result” वर क्लिक करा.
  • तुमचा सीट नंबर हॉल तिकीटावर जसा आहे तसाच टाका.
  • तुमच्या आईचे पहिले नाव (बोर्डमध्ये नोंदवलेले) टाका.
  • टीप: जर अर्जात आईचे नाव दिले नसेल तर त्या ठिकाणी XYZ टाका
  • “View Result” वर क्लिक करा.
  • तुमचा महाराष्ट्र HSC निकाल 2026 विषयानुसार गुण, ग्रेड आणि अंतिम निकालासह दिसेल.
  • निकाल डाउनलोड करून सेव्ह करा.
  • प्रिंट काढून ठेवा – ही तात्पुरती मार्कशीट आहे आणि कॉलेज अ‍ॅडमिशनसाठी वैध आहे.

पद्धत २: hscresult.mkcl.org

  • hscresult.mkcl.org ही वेबसाइट ओपन करा.
  • तुमचा सीट नंबर आणि आईचे पहिले नाव टाका.
  • Get Result वर क्लिक करा.
  • निकालाच्या दिवशी ही वेबसाइट mahresult.nic.in पेक्षा जास्त ट्रॅफिक सहज हाताळते.