अलिबाग: बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे ठाकरे आणि शिवसेना वेगळी होऊ शकत, मराठी माणसासाठी सन्मानासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे आणि मावळय़ांच्या जोरावर शिवसेना पुढे जात आहे, त्यामुळे जर तुम्ही शिवसेना सोडून जाणार असाल तर तुम्ही स्वत:चीच कबर खणत आहात, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना लगावला. ते अलिबाग येथे शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमित शहा यांनी शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा दिलेला शब्द फिरवला नसता, तर एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते. पण भाजपने दिलेला शब्द पाळला नाही म्हणून युती तोडायची वेळ आली. आज शब्द फिरवणाऱ्या भाजपबरोबर जाणार का, असा सवाल त्यांनी बंडखोर आमदारांना या वेळी केला. शिवसेना संपवण्याचे कारस्थान सुरू आहे, पण शिवसेना संपणार नाही. गद्दारांना माफी दिली जाणार नाही आणि त्यांच्यासमोर झुकणारही नाही अशी रमेखठोक भूमिकाही राऊत यांनी या वेळी मांडली. स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्यावरही त्यांनी टीका केली.  एकनाथ शिंदे यांच्या बरोबरचे २२ आमदार इतर पक्षांतून आलेले, त्यामुळे यांचे हिंदुत्व कुठून आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to go word spinning bjp sanjay raut question rebels ysh
First published on: 29-06-2022 at 01:32 IST