Step-by-step guide to Check Maharashtra 12th Result via SMS and DigiLocker: महाराष्ट्रातील बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपत आली आहे. महाराष्ट्र HSC निकाल 2026 उद्याच म्हणजे २ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार असून, हजारो बारावीचे विद्यार्थी आपले गुण जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) आपला बारावीचा निकाल 2026 mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करेल.
बारावीचा निकाल नेमका कसा पाहायचा, वेबसाईट लोड होत नसेल तर SMS आणि DigiLocker वरून मार्कशीट कशी डाउनलोड करायची याबद्दलची संपूर्ण माहिती या लेखातून जाणून घेऊ या…
SMS द्वारे सीट नंबर वापरून महाराष्ट्र HSC निकाल 2026 कसा पाहायचा
जर अधिकृत वेबसाइटवर जास्त ट्रॅफिकमुळे निकाल पाहता येत नसेल, तर…
- विद्यार्थी आपला सीट नंबर SMS द्वारे पाठवून निकाल पाहू शकतात.
- निकालाच्या दिवशी MSBSHSE कडून एक नंबर दिला जाईल.
- त्या नंबरवर सीट नंबर पाठवल्यानंतर निकाल तुमच्या मोबाईलवर येईल.
- हा सोपा आणि विश्वासार्ह पर्याय आहे.
DigiLocker द्वारे महाराष्ट्र HSC मार्कशीट 2026 डाउनलोड
DigiLocker वर आधीच “Coming Soon” असा मेसेज दिसत आहे, म्हणजे बोर्ड निकाल अपलोड करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. विद्यार्थी खालील पद्धतीने आपली मार्कशीट डाउनलोड करू शकतात:
- digilocker.gov.in ला भेट द्या किंवा मोबाईलमध्ये DigiLocker अॅप उघडा.
- आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरने लॉगिन करा.
- “Education” किंवा “Issued Documents” विभागात जा.
- “Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education” निवडा.
- आपला सीट नंबर आणि आईचे पहिले नाव (hall ticket वर जसे आहे तसे) टाका.
- “Get Document” वर क्लिक करा आणि तुमची डिजिटल मार्कशीट मिळवा.
- मार्कशीट आपोआप DigiLocker खात्यात सेव्ह होईल.
DigiLocker वरील डिजिटल मार्कशीट कॉलेज अॅडमिशनसाठी मान्य असते आणि बहुतेक ठिकाणी उपयोगी पडते. तरीही, विद्यार्थ्यांनी शाळेतून मिळणारी मूळ मार्कशीट नंतर घेणे आवश्यक आहे.
