वसमतमध्ये चार दिवसात दोन जोडप्यांचा मृत्यू
वसमत तालुका चार दिवसात दोन जोडप्यांच्या मृत्युने हादरला. वाखारी येथे पती पत्नीने एकमेकांसोबत विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी विरेगाव येथे कालव्यात बुडून पत्नीचा मृत्यू होताच पतीने नजीकच्या झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.
वीरेगावातील वंदना नारायण उर्फ गुलाब लोखंडे (वय ४०) यांचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती पती नारायण उर्फ गुलाब लोखंडे (वय ४७) यांनी कालव्याच्या शेजारच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
वाखारी येथे १५ मे रविवार रोजी दुपारी स्वत:च्या शेतात शिवाजी गंगावळे (वय २७) व त्यांची पत्नी शिवलीला शिवाजी गंगावळे (वय २४) या दोघांनी एकमेकांसोबत विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.
आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने केली हे समजू शकले नाही. या दोघांचे २०२१ मध्ये लग्न झाले होते. या घटनेची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि विलास चवळी, आडे, अजय पंडित, अविनाश राठोड यांनी पंचनामा केला. याप्रकरणी १९ मे गुरुवार दुपारपर्यंत पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
दुसरी घटना तालुक्यातील विरेगाव शिवारात असलेल्या कालव्यात १८ मे रोजी १२ वाजता वंदना नारायण उर्फ गुलाब लोखंडे (वय ४०) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.या घटनेची माहिती पती नारायण उर्फ गुलाब लोखंडे (वय ४७) यांना मिळताच त्यांनी कालव्याच्या शेजारील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतला. या घटनेची माहिती हट्टा पोलिसांना मिळताच, ठाण्याचे सतीश तावडे, ठाकूर, भुजंग कोकरे यांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी गुरुवारी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. तालुक्यातील दोन गावात दोन जोडप्याचा वेगवेगळ्या प्रकारच्या घटनेत मृत्यू झाल्याने वसमत हादरला.