i-am-not-in-politics-either say amit-thackeray | Loksatta

“…तर मी देखील राजकारणात आलो नसतो”; अमित ठाकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण

मनविसेची पुनर्बांधणी करण्यासाठी अमित ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

“…तर मी देखील राजकारणात आलो नसतो”; अमित ठाकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचा शिवसेनेवरुन सुरु असलेला वाद आता टोकाला पोहचला आहे. शिवसेना नेमकी कुणाची? याबाबतच फैसला आता सुप्रीम कोर्टातच होईल. सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या या राजकारणावरुन मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मोठं विधान केलं आहे. या विधानानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा- टीईटी घोटाळा : शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावे?

अमित ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा

“सध्याच राजकारण बघता तरुणांनी राजकारणात यावं का? या प्रश्नावर त्यांनी मी जर तर मी देखील राजकारणात आलोच नसतो”, असं थेट उत्तर दिलं आहे. सध्या अमित ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पक्ष बाधंणीसाठी ते राज्यभरातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. नुकताच त्यांनी कोकण दौरा केला असून सध्या ते नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकच्या मालेगावमधील विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला आहे. राज ठाकरेंसोबत काम करण्यासाठी अनेक युवा उत्सुक असल्याचे या दौऱ्यादरम्यान दिसून येत आहे.

हेही वाचा- मुख्यमंत्र्यांचा दौरा अन् नांदेडमध्ये शिवसेनेला खिंडार

दौऱ्यामुळे मनसेची ताकद वाढण्याची शक्यता

या संकट काळात राज ठाकरे उद्धव ठाकरेंची मदत करणार का? या प्रश्नावर मात्र अमित ठाकरेंनी उत्तर देणं टाळलं. याबाबत राज ठाकरेच निर्णय घेतील आणि त्यांच्या मताशी मी सहमत असल्याचे अमित ठाकरे म्हणाले. अमित ठाकरेंच्या दौऱ्यामुळे मनसेची ताकद वाढण्याची शक्यता आहे. तसेच मनसे आणि भाजपाची वाढती जवळिकीचाही अगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत याचेही परिणाम दिसून येऊ शकतात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Maharashtra News Update : महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर…

संबंधित बातम्या

“तुम्ही छत्रपतींनाच बेईमान ठरवलंत”, संजय राऊतांची भाजपावर आगपाखड; म्हणाले, “कौन बनेगा करोडपतीसारखं…!”
CM शिंदेंची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंगलप्रभात लोढांविरुद्ध संभाजी ब्रिगेड आक्रमक; म्हणाले, “मूग गिळून…”
“…तर आता यांच्या पोटात गोळा यायला लागला”, उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंवर टीकास्र
“एक मिनिटात MSMEचा फुलफॉर्म सांगावा, मग…”, नारायण राणेंना राऊतांचे आव्हान
“घोडचुकीनंतर एखादा निर्लज्जच…” राज्यपाल कोश्यारींच्या विधानावर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विश्लेषण: कोरे कागद घेऊन हजारो चिनी नागरिक रस्त्यावर का उतरत आहेत? A4 Revolution आंदोलनं कधी, कशी सुरु झाली?
कार्तिक आर्यनच्या आधी वरुण धवनला झाली होती ‘हेरा फेरी ३’ची विचारणा, पण ‘या’ कारणामुळे अभिनेत्याने नाकारली ऑफर
पुणे: मनोरुग्णालयाच्या जागेवरील बेकायदा झोपड्या हटविण्याचे आदेश
Video : रात्रीच मरीन ड्राईव्हला जाऊन बसली महेश मांजरेकरांची लेक, व्हिडीओही केला शेअर, म्हणाली…
पुण्यात सुशोभीकरणासाठी घेणार उद्योजक, बँकांची मदत; विक्रम कुमार यांची माहिती