‘मै तो कोल्हापूर मै रहने के लिये तैयार हूं, बस वक्त चाहियें’ अशा शब्दांत भाजपचे पंतप्रधानपदाचे दावेदार नरेंद्र मोदी यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बुधवारी संवाद साधताना कोल्हापूरविषयी प्रेम व्यक्त केले. कोल्हापूर, हातकणंगले, सांगलीतील महायुतीच्या प्रचारासाठी मोदी येथे आले असता स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी हे कोल्हापूरप्रेम व्यक्त केले.
करवीरनगरी, इथली संस्कृती या साऱ्यांची माहिती घेतानाच मोदी यांनी आपण खूप दिवसांपासून या शहराविषयी ऐकत आलो आहे. या शहरात मला राहायला आवडेल असे मत व्यक्त केले. या वेळी खासदार सदाशिवराव मंडलिक, उमेदवार संजय मंडलिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके व भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यांना पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am ready to live in kolhapur modi
First published on: 11-04-2014 at 03:38 IST