scorecardresearch

Dasara Melava 2022 : “तुमच्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्याचीही माझी ऐपत नाही”, पंकजा मुंडेंचं विधान

दसरा मेळाव्यासाठी हजर झालेल्या लोकांना बसण्यासाठी खुर्च्याची व्यवस्था करण्याचीही आपली ऐपत नाही, असं विधान पंकजा मुंडेंनी केलं आहे.

Dasara Melava 2022 : “तुमच्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्याचीही माझी ऐपत नाही”, पंकजा मुंडेंचं विधान

महाराष्ट्रात आज (५ सप्टेंबर) तीन दसरा मेळावे पार पडत आहेत. या तीन मेळाव्यांकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दोन वेगवेगळे मेळावे होणार आहेत. तर, दुसरीकडे बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे भाजपा नेते आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडत आहे. या दसरा मेळाव्याला बीड जिल्ह्यासह राज्यभरातील कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली आहे.

दरम्यान, त्यांनी आपल्या भाषणातून २०२४ च्या निवडणुकीत लढण्याचे संकेत दिले आहेत. भारतीय जनता पार्टीनं आपल्याला तिकीट दिलं तर २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीला लागणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी दसरा मेळाव्यासाठी हजर झालेल्या लोकांना बसण्यासाठी खुर्च्याची व्यवस्था करण्याचीही आपली ऐपत नाही, असं विधानंही केलं आहे.

हेही वाचा- Dasara Melava 2022 : “पंकजा मुंडेंच्या एका ट्वीटवर लाखो लोक गोळा होतात, नरेंद्र मोदींना…,” मंचावरुनच महादेव जानकरांचं विधान

त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, “हकीकत को तलाश करना पडता हैं, अफवा तो घर बैठे बैठे मिल जाती हैं. इथं जमलेले लोक ही माझी ‘हकीकत’ आहे, माझी शक्ती आहे. माझ्याकडे तुम्हाला बसायला द्यायला खुर्च्या नव्हत्या, तुमची व्यवस्था करण्याची माझी ऐपत नाही. तुम्ही दाटीवाटीने इथं बसला आहात. खुर्च्या लावल्या असत्या तर हा मेळावा किती मोठा झाला असता. किमान चारपट तरी झाला असता. तुम्ही जमिनीवर बसणं गोड मानलं, मी तुमचे आभार मानते, असं पंकजा मुंडे भाषणातून म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या