Devendra Fadnavis on Thackeray Brothers : मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आम्ही एकत्र आल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय. ते काल पुण्यात आयोजित केलेल्या मुलाखतीत बोलत होते. अभिनेत्री गिरिजा ओक हिने ही मुलाखत घेतली.
अजित पवार सारखी टीका का करतात? असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला होता. त्यावर फडणवीस म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला आधी लक्षात आलं होतं की पुणे, पिंपरी चिंचवड येथे आम्ही युतीने लढू शकत नाही. कारण येथे दोन्ही स्ट्रॉन्ग पक्ष आहेत. आपण जिथे वेगवेगळे लढत आहोत, तिथे मैत्रीपूर्ण लढत समजुया. एकमेकांवर आणि पक्षांवर टीका करू नये, असं आम्ही ठरवलं होतं. मी आतापर्यंत संयम पाळला आहे, त्यांचा संमय जरा ढळला आहे. सध्या निवडणुकीतील परिस्थिती पाहून दादांचा संयम कमी झालेला वाटतोय. त्यामुळे ते बोलत आहेत. पण १५ तारखेनंतर नाही बोलणार.” असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.
मला याचे आशीर्वादच मिळतील
तुम्ही लोकांना जवळ करण्यात एक्सपर्ट आहात. मुंबईत भाऊ-भाऊ जवळ आलेत, पुण्यात भाऊ-बहीण जवळ आले, असं देवेंद्र फडणवीसांना सांगितलं असता ते म्हणाले, “माझ्यामुळे कोणतंही कुटुंब जवळ येत असेल तर मला आनंद आहे. मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी मला क्रेडिट दिलं. आणि ते क्रेडिट याकरता घेतलं की शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं, की दोन भाऊ एकत्र यावेत. पण ते त्यावेळेला आले नाहीत. पण ते माझ्यामुळे एकत्र येत असतील तर मला असं वाटतं की मी चांगलंच काम केलं आहे आणि मला त्याचे आशीर्वादच मिळतील. पण आता बहीण भाऊ (अजित पवार-सुप्रिया सुळे) एकत्र आले आहेत का आणि ते माझ्यामुळे आले असतील तर ते मला धन्यवाद देणार आहेत का याची मला कल्पना नाही”, असंही ते मिश्लिकपणाने म्हणाले.
