महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर राष्ट्र्वादीचे अध्यक्ष शरद पवारांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय कुस्तीगीर महासंघाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त बरखास्त केली आहे. शरद पवार हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त झाल्यामुळे पवारांसोबत महाराष्ट्रातील मल्लांना धक्का बसला आहे.

भारतीय कुस्तीगीर महासंघाची बैठकीत निर्णय
नवी दिल्ली येथे ३० जून रोजी भारतीय कुस्तीगीर महासंघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या काही दिवसांमध्येच राज्य कुस्तीगीर परिषदेवर हंगामी समितीची नियुक्ती केली जाणार होती. मात्र, त्याआधीच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आले.

परिषद बरखास्त होण्यामागे बाळासाहेब लांडगे जबाबदार
या अगोदरही राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. तसेच राष्ट्रीय महासंघाच्या अनेक प्रस्तवाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. महारष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्यामुळेच ही कारवाई झाल्यचा आरोप करण्यात आला आहे. लांडगे आपला मनमानी कारभार चालवायचे. ते अध्यक्षांचा आदेशही पाळत नसल्याचा आरोप पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी केला आहे.