Ajit Pawar Statement on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही आमदारांना हाताशी घेऊन अजित पवारांनी पक्षावर दावा ठोकला अन् महायुतीत समाली झाले. त्यामुळे विरोधी बाकावर बसलेले अजित पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री विराजमान झाले. यासाठी त्यांना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि त्यांचे मोठे काका शरद पवार यांच्याशी फारकत घ्यावी लागली. एकाच कुटुंबातील असूनही दोन्ही पवारांची राजकीय भूमिका आता वेगवेगळी आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावरही ही राजकीय वादाची छाया पडली आहे का? असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. यावर त्यांनी आज भाष्य केलं आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तरीही घरात कसं वातावरण असतं? सणवारांना तुम्ही एकत्र येता का? समोरा समोर आल्यावर तुमची प्रतिक्रिया काय असते? असा प्रश्न अजित पवारांना या कार्यक्रमात विचारण्यात आला. त्यावेळी अजित पवारांनी उत्तर दिलं की, आम्ही एकमेकांना भेटलो. एकत्र येऊन दिवाळी साजरी केली होती. आमच्या येथे आमच्या काकी आहे सरोज पाटील. सरोज पाटील यांचे पती एन. डी. पाटील. ते जेव्हापासून राजकारणात होते तेव्हापासून आमच्याविरोधात होते. पण आमच्या घरी यायचे तेव्हा घरात राजकारण नसायचं. घरात कोणी एकमेकांना जेवायला देत नाही का?”

हेही वाचा >> Ajit Pawar : “मला मुख्यमंत्री व्हायचंय, पण…” अजित पवारांचं मोठं विधान; खंत व्यक्त करत म्हणाले…

शरद पवारांच्या समोर मी मान खाली घालेन

त्यानंतर अजित पवार यांना विचारण्यात आलं की, कॅमेऱ्याच्या मागच्या शेवटच्या रांगेत शरद पवार बसले आहेत. त्यांना तुम्ही आज काय सांगाल? त्यावर अजित पवार म्हणाले, “ते माझे मोठे काका आहेत. मी त्यांना काय बोलणार? मी त्यांच्या डोळ्यांत डोळे घालूनही पाहू शकत नाही. मी मान खाली घालेन.”

मला मुख्यमंत्री व्हायचंय पण…

अजित पवार हे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहिलेले आमदार आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाची आस आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “मला मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे. पण मी उपमुख्यमंत्रीपदाच्या पलीकडे जाऊ शकत नाही”, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. याबाबत ते म्हणाले, “मला मुख्यमंत्री बनायचं आहे. पण माझी गाडी उपमुख्यमंत्री पदावरच अडकली आहे. गाडी पुढे जावी याचा मी प्रयत्नही करतोय. पण संधीच मिळत नाही.”