राज्यातील सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रवीणसिंह परदेशींना मंत्रालयात नियुक्ती!

मुंबईचे माजी पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची मराठी भाषा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

mantralay building
मंत्रालय इमारत (संग्रहीत छायाचित्र)

मुंबईतील करोनाच्या परिस्थिती बिकट झाल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी मे महिन्यात तत्कालीन मुंबई पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी इकबाल सिंह चहल यांच्याकडे मुंबई पालिका आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. आता प्रविणसिंह परदेशी यांना मंत्रालयातील मराठी भाषा विभागाच अतिरिक्त मुख्य सचिव पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. प्रवीणसिंह परदेशी यांच्यासोबतच राज्यातील इतर ६ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. त्याची यादी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

कुणाची कुठे झाली बदली?

१. १९८५च्या बॅचचे आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांना मंत्रालयातील मराठी भाषा विभागामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

२. रणजित कुमार (२००८) यांची मंत्रालयातील आयटी विभागाच्या संचालक पदावरून मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव पदावर बदली करण्यात आली आहे.

३. व्ही. पी. फड (२०११) यांची उस्मानाबादच्या सीईओ पदावरून मराठवाडा स्टॅच्युटरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या सदस्य सचिव पदावर बदली करण्यात आली आहे.

४. पंकज आशिया (२०१६) यांची भिवंडी-निजामपूर महानगर पालिकेच्या आयुक्तपदावरून जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओपदी बदली करण्यात आली आहे.

५. राहुल गुप्ता (२०१७) यांची गडचिरोली अहेरीतल्या आयटीडीपीचे प्रकल्प अधिकारी आणि सहय्यक जिल्हाधिकारी यांची उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सीईओ पदावर बदली करण्यात आली आहे.

६. मंनुज जिंदाल (२०१७) गडचिरोली भामरागडच्या आयटीडीपीचे प्रकल्प अधिकारी आणि अटापल्ली सबडिव्हिजनचे सहाय्यक जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांची जालना जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून बदली करण्यात आली आहे.

७. मिताली सेठी (२०१७) यांची अमरावती धेरणीच्या आयटीडीपीचे प्रकल्प अधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सीईओ पदावर बदली करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ias officer transfer orders 7 officer list including praveen singh pardeshi pmw

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या